Solar Cooking System : मोदी साहेबांनी सौर उर्जेवर चालणाऱ्या अनोख्या स्टोव्हचे केले अनावरण! सिलेंडर वरील खर्च होईल पूर्णपणे कमी !

Spread the love

आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौर उर्जेवर चालणारा एक विशेष अशा स्टोव्हचे अनावरण केले आहे. मित्रांनो हा एक अनोखा स्टोव्ह असून आता सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. म्हणजेच सिलेंडरवर होणाऱ्या खर्चाची बचत या स्टोव्हमुळे होईल.

Solar Cooking System : मित्रांनो हा स्टोव्ह इंडियन ऑइल ने लॉन्च केला असून याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्टोव्ह च्या माध्यमातून तुमच्या स्वयंपाक घरातील लागणाऱ्या सिलेंडर वरील खर्च पूर्णपणे कमी होईल.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने तयार केलेला सोलर कुकर सोलर स्टोव्ह आपण आपल्या घरामध्ये सहज वापरू शकतो. घरामध्ये म्हणजेच आपल्या स्वयंपाक घरामध्ये. विशेष म्हणजे सोलर कुकिंग स्टोव्ह रिचार्ज देखील केला जाऊ शकतो.

एस एस व्ही राजकुमार या स्टोव्हबाबत असे सांगत आहेत की, हा स्टोव्ह सोलर कुकर पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. महत्वाचे म्हणजे काम करत असताना हा स्टोव उन्हात ठेवावा लागत नाही. ह्या स्टोव्ह वर संशोधन फरीदाबाद मधील संशोधकांनी व विकास विभागाने केले आहे. आपल्या छतावर ठेवलेल्या पीव्ही पॅनलच्या माध्यमातून जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेवर हा स्टोअर चालतो या स्टोव्हमुळे आपले पैशांचे बचत होऊन याचा प्रदूषणावर कोणताही परिणाम होत नाही.

एका कुटुंबासाठी तीन वेळचे अन्न तयार केले जाईल

इंडियन ऑइल कंपनीने ह्या स्टोव्हला एक विशेष केबल जोडले आहे आणि ती केबल आपल्या छतावरील सोलर प्लेटला जोडले आहे. सोलर प्लेटच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती होते आणि ती ऊर्जा स्टोव्ह पाठवली जाते.

आणि विशेष म्हणजे सोलर प्लेटच्या माध्यमातून जी ऊर्जा निर्मिती होती ती एका बॅटरीमध्ये देखील साठवली जाते. या माध्यमातून तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जवळपास तीन वेळचे जेवण सहजपणे तयार करू शकता.

देशभरात चाचणी घेण्यात आली…

या स्टोव्हचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले असून देशभरामध्ये 60 ठिकाणी या स्टोअरचा प्रयोग करण्यात आला आहे. या माध्यमातून आपण उघडणे तळणे बेकिंग इत्यादी सर्व गोष्टी करू शकतो.

किंमत काय असेल?

इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की. आता आमचा स्त्रोहुचा व्यवसायिक लॉन्चिंगचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. आता सर्वांना आतुरता लागली होती की याची किंमत काय असणार आहे. तर याची किंमत कमीत कमी 18 हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीस हजार रुपये या दरम्यान असू शकते. यामध्ये विविध मॉडेल आहेत.

जर तुम्ही शासकीय अनुदानाच्या माध्यमातून स्टोव्ह खरेदी केला तर तुमची वरील किमतीमध्ये दहा ते बारा हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते आणि हा स्टोव्ह आपण दहा वर्षांपर्यंत वापरू शकतो.

Leave a Comment