राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनांकडून एक अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . तो म्हणजे राज्यातील नगर विकास विभाग मंत्रालय तसेच नगर रचना आणि मुल्यानिर्धारण संचालनालयाच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी / कर्मचाऱ्यांकरीता स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी / कर्मचारी पुरस्कार योजना हा अभिनव उपक्रम राबविण्याबाबत नगर विकास विभागाकडून दि.22.02.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपली कर्तव्ये अधिक कार्यक्षमपणे व गतिमानतेने पार पाडण्यासाठी प्रवृत्त व प्रोत्साहित करण्याकरीता वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित उत्कृष्ट अधिकारी / कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याची योजना अस्तित्वात नव्हती .यामुळे आता शासनाच्या नगर विकास विभागाच्या अखत्यारितील नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या तसेच नगर विकास आस्थापनेतील कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा पुरस्कार देवून गौरव करण्यासाठी स्वराज्य अभियंता हिरोजी इंदूलकर गुणवंत अधिकारी / कर्मचारी पुरस्कार ही योजना सन 2022-23 या आर्थिक वर्षापासून सरु करण्यास सदर शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे .
प्रतिवर्षी सदर पुरस्कार हा दि.31 जानेवारी या नगर रचना दिवशी प्रदान करण्यात येणार आहे . यामध्ये पुरस्कारास पात्र ठरलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे .पुरस्कार प्रदान करण्याकरीता विविध निकष सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
पुरस्कार देण्याची कार्यपद्धती , पुरस्कारासाठी अंतिम निवड करावयाची पद्धती तसेच पुरस्कारासाठी निकष पुर्ण करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांनी शिफारस करण्याकरीता निवड समितीची स्थापना इत्यादी बाबी सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या आहेत . या संदर्भातील नगर विकास विभागाकडून दि.22.02.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटकरीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !