7 व्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अनुज्ञेय करणेबाबतचा वित्त विभागाचा सुधारित शासन निर्णय !

Spread the love

सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत वित्त विभागाकडून दि.02 मार्च 2019 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .वित्‍त विभागाकडून या संदर्भात दि.02.03.2019 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे सविस्तर पाहुयात .

7 व्या वेतन आयोगांमध्ये 3 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही वेतन मॅक्ट्रीक्समधील एस 20 पर्यंत वेतन घेणाऱ्या कर्मचारी / अधिकारी यांना लागू असणार आहे . संबंधित कर्मचारी / अधिकारी हे कोणत्याही कारणामुळे वेतनस्तर एस 21 मध्ये वेतन आहरीत करु लागतील तेव्हा त्यांना उपरोक्त नमुद नविन योजना अंतर्गत लाभ अनुज्ञेय असणार नाही .

या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत पात्र कर्मचारी / अधिकारी यांना संपुर्ण कालावधीत पात्रतेनुसार तीन वेळा या योजनेचा लाभ मंजूर करण्यात येईल . मात्र ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना दोन कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या आहेत , अशा कर्मचाऱ्यांना या योजना खाली फक्त एकच लाभ अनुज्ञेय होईल .म्हणजेच संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना एकाच पदोन्नती साखळीतील पदावर मिळून त्यांची एकुण नियमित व सलग सेवा 30 वर्षे असल्यास 30 वर्षाच्या कालावधीत झालेल्या कार्यात्मक पदोन्नती व लाभ यांची संख्या , किमान तीन असेल . त्याशिवाय ज्या कर्मचारी / अधिकारी यांना तीन कार्यात्मक पदोन्नती मिळालेल्या आहेत , अशा कर्मचाऱ्यांना एकही लाभ अनुज्ञेय ठरणार नाही .

त्याचबरोबर या योजना अंतर्गत एकाच पदोन्नती साखळीतील पदावर मिळून झालेल्या संपुर्ण सेवा कालावधीमध्ये सदर कर्मचाऱ्यास सुरुवातीस लाभ मंजुर झाला असल्यास व तदनंतर लाभाच्या वेतनश्रेणीत त्याची कार्यात्मक पदोन्नती झाल्यास , पुन्हा वेतन निश्चितीचा लाभ अनुज्ञेय नसल्याने अशा पदान्नतीची गणना एकूण तीन कार्यात्मक पदोन्नतीच्या संख्येमध्ये करण्यात येणार नाही .

या सेवांतर्गत 3 लाभाच्या योजनेच्या लाभार्थीस पदोन्नतीच्या पदाकरीता विहीत केलेली शैक्षणिक अर्हता ,ज्येष्ठता , पात्रता , अर्हता परीक्षा , विभागीय परीक्षा , गोपनिय अहवालाची प्रतवारी , विभागीय चौकशी व न्यायिक प्रकरण प्रलंबित नसणे , अशा पदोन्नतीच्या कार्यपद्धतीची विभागीय समितीच्या बैठकीत पूर्तता करणे आवश्यक असणार आहे .

ज्या अधिकारी / कर्मचारी यांनी या पुर्वीच अनुज्ञेयतेनुसार यथास्थिती कालबद्ध पदोन्नती योजना अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ यापूर्वीच घेतला असल्यास , सदर लाभ हे तीन लाभाच्या योजना खालील प्रकरणपरत्वे पहिला व दुसरा लाभ समजण्यात येतील .

या संदर्भातील वित्त विभागांकडून दि.02 मार्च 2019 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment