Senior Citizens Savings Scheme : अर्थसंकल्पनेमध्ये नागरिकांना दिले सरकारने गिफ्ट! या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास होईल बंपर कमाई : जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

2023-24 च्या कालखंडातील अर्थसंकल्पना सादर करत असताना बुधवारी अर्थमंत्री निर्मला सितारामन अशा म्हणाल्या की, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये खाते उघडले असेल तर तुम्हाला आता मोठा फायदा होईल.

Senior Citizens Savings Scheme : अर्थमंत्री निर्मला सीतारामन अशा म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांना या अर्थसंकल्पनेमध्ये भेट देण्यात आली आहे. तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये खाते उघडले किंवा खाते उघडण्याची योजना खाली त्तर तुम्हाला त्यामध्ये खूप मोठा फायदा होईल.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार अधिक लाभ

आतापासूनच ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक लाभ मिळेल यासोबत ज्येष्ठ नागरिक बचत योजने च्या माध्यमातून कमल ठेव मर्यादा ही 15 लाख रुपयांवरून तब्बल तीस लाख रुपये पर्यंत करण्यात आले आहे.

मर्यादा किती वाढली?

याशिवाय एकल खात्यासाठी प्रति महिन्याचे उत्पन्न खाते योजनेकरिता जास्तीत जास्त ठेव ही साडेचार लाख रुपयांवरून थेट नऊ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच संयुक्त खात्यासाठी ही मर्यादा 9 लाख रुपयांपासून पुढे ढकलून 15 लाख रुपयांपर्यंत करण्यात आले आहे.

सरकारने व्याजदर वाढवले

यासोबतच SCSS एक मार्च संपलेल्या तिमाही करिता जवळपास आठ टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे. यासोबतच शासनाच्या या निर्णयामुळे जे कोणी जेष्ठ नागरिक असतील आणि त्यामध्ये त्यांनी गुंतवणूक केली असेल तर त्यांचे उत्पन्न चांगलेच वाढेल हे आपल्यासमोर स्पष्टपणे दिसत आहे. सरकारने व्याजदर मध्ये देखील वाढ करून करोडो ज्येष्ठ नागरिकांना मोठी बातमी दिली आहे.

खाते कोण उघडू शकते?

SCSS मध्ये खाते उघडण्याकरिता सर्वात प्रथम नागरिकांचे वय हे साठ वर्षे कमीत कमी असावी यासोबतच साठ वर्षांपेक्षा जास्त वय वर्ष असलेले लोक देखील सहजपणे खाते उघडू शकतील. यासोबतच ज्यांनी व्ही आर एस म्हणजेच सोवैचिक सेवानिवृत्ती योजना या योजनेमध्ये बागेतला आहे ते लोक सुद्धा या योजनेच्या माध्यमातून खाते उघडू शकतील.

कॅपेक्स किती होता?

याशिवाय अर्थसंकल्पनेच्या माध्यमातून एकूण कॅपेक्स परिव्यय साडेसातला कोटी रुपयांवरून थेट दहा लाख कोटी रुपये पर्यंत करण्यात आलेला आहे. यामध्ये त्यांनी ते 30 टक्क्यांनी वाढ केले आहे. निर्मला सीतारामन यांनी या माध्यमातून असे घोषित केले आहे की, भांडवली गुंतवणूक परिवय सलग तीन वर्षाकरिता 33% ने वाढून दहा कोटी रुपयांवर नेण्यात आले आहे. जो जीडीपीच्या तीन टक्के पर्यंतचा भाग असेल.

Leave a Comment