राज्य शासनाने घेतला मोठा निर्णय : शाळेच्या वेळांमध्ये करण्यात आला मोठा बदल ,पुढील वर्षीपासून होणार लागु !

Spread the love

राज्य शासनाने शाळेच्या वेळांमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे . आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या निवासी आश्रमशाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आलेला असून ,याबाबत आदिवासी विकास विभाग , मंत्रालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारितील सर्व निवासी आश्रमशाळांच्या वार्षिक वेळापत्रकाबाबत आराखडा क्‍वेस्ट कार्यालयामार्फत करण्यात आला आहे .

निवासी आश्रमशाळाचे सोमवार ते शुक्रवार करीता सकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांना उठविणे व प्रात : विधीचा वेळ असणार आहे .तर सकाळी 7.50 मिनिटाला शाळेची प्रार्थना होणार आहे , तर शाळेची पहिली तासिक 8.20 मिनिटाला सुरुवात होणार आहे .तर 10.15 मिनिटाला मधीली छोटी सुट्टी होणार आहे .12.20 मिनिटाला जेवणाची सुट्टी होईल .तर 3.25 मिनिटाला राष्ट्रीय गीत होवून शाळेचे एकुण 9 तासिका पुर्ण होतील .

सायंकाळी 5.30  ते 6.30 या वेळेमध्ये स्पर्धांची तयारी , अतिरिक्त तासिका , वाचनालयातील वेळ करीता राखीव वेळ असणार आहे .त्यानंतर विद्यार्थ्यांचे रात्रीचे जेवण 6.30 वाजता होईल तर 7.30 ते 9.00 या वेळेमध्ये स्वयंअध्ययन होईल .तर झापेची वेळ रात्री 10.15 ते सकाळी 5 पर्यंत असेल .

सध्या 11.00 वाजता शाळा भरते तर 5.00 वाजता शाळा सुटते , परंतु आता नविन धोरणानुसार आता पुढील वर्षांपासून सकाळी 7.50 वाजता शाळा भरेल व 3.30 मिनिटांना शाळा सुटेल .या संदर्भातील सुधारणा करण्यात आलेले नविन वेळापत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment