सेवानिवृत्त होणाऱ्या / झालेल्या कर्मचाऱ्यांना 01 जुलैची काल्पनिक / अतिरिक्त वेतनवाढ अनुज्ञेय करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

Spread the love

राज्य शासन सेवेतून दि.30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना दि.01 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय करण्याबाबत शिक्षण संचालनालय यांच्याकडुन दि.15 फेब्रुवारी 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .या संदर्भातील शिक्षण संचालनालय यांचे सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .

दि.30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दि.01 जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ देउॅन निवृत्तीवेतन मिळण्याबाबतच्या प्रकरणी वित्त विभागाने पुढील प्रमाणे अभिप्राय दिलेले आहेत . सदर प्रकरणी सद्यस्थितीत शासनाचे कोणतेही धोरण ठरलेले नाही .तसेच शासनाने कोणतेही नियम निर्गमित केलेले नाहीत .केंद्र शासनाच्या दि.03.02.2021 रोजीच्या ज्ञापनान्वये श्री अय्यमपैरुनल यांच्या व्यक्तीगत प्रकरणी झालेला निर्णय हा इन रिम बाबतचा प्रश्न अजून ओपन असल्याचे नमुद केले आहे .

तसेच केंद्र शासनाच्या दि.24.06.2021 रोजीच्या ज्ञापनान्वये अन्य प्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणाच्या आदेशास स्थगिती दिल्याचे नमूद केलेले आहे .तसेच केंद्र शासनाने दि.01/07/2021 रोजीच्या पत्रान्वये सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना दि.24.06.2021 रोजीचे पत्र पाठविले आहे .

सबब अशा प्रकरणांमध्ये केंद्र शासनाने कोणताही आदेश निर्गमित केलेला नसल्याने राज्य शासनाने अद्याप‍ि कोणताही निर्णय घेतलेला  नाही .उपरोक्त वस्तुस्थिती मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या निदर्शनास आणणे शासनाने आदेश दिले आहे .तरी शासनाने वेळोवेळी घालून दिेलेल्या अटी व शर्ती प्रचलित शासन नियमानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मा. आयुक्त व संचालनालयास सादर करावा असे आदेशित करण्यात आलेले आहेत .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment