बातमी कामाची ! रेशीम शेतीसाठी प्रति एकरामागे शासन देणार एक लाखाचे कर्ज ! लाभ घेण्यासाठी या ठिकाणी अर्ज करा !

Spread the love

one lakh loan available for sericulture : शेतकरी मित्रांनो नमस्कार, आज खास उस्मानाबाद मधील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. येथील शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्यासाठी प्रति एकरामागे एक लाखाचे कर्ज उपलब्ध होत आहे. हे कर्ज आता फक्त उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच उपलब्ध होणार आहे. पुढील जिल्ह्यासाठी अजून अपडेट आले नाही पण लवकरच येण्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री डॉक्टर सचिन ओंबासे ज्यांनी जिल्हाभरातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यास पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यामधील सर्व बँकांना शेतकऱ्यांना प्रति एकर मागे एक लाख रुपये कर्ज द्यावे असा आदेश यांनी केला.

दरम्यानच आता यंदाच्या वर्षी जिल्ह्यामध्ये दहा हजार एकरावर रेशीम शेतीचे टार्गेट ठेवण्यात आले असून आता जिल्हाधिकारी महोदय यांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्ह्यातील बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी धावपळ करत आहेत.

यामुळे आता निश्चितच शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. याबाबत एक बैठक देखील झाली असून बैठकीमध्ये रेशीम शेती करण्यासाठी प्रति एकरमागे सर्व शेतकरी बंधू भगिनींना एक लाख रुपयांचे कर्ज द्यावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावावर अनेक बँकांनी सहमती दर्शविली.

दरम्यानच्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळवण्यास शासन लवकरच प्रयत्न करत आहे. याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल.

Leave a Comment