शेतकरी मित्रांनो रेशीम उद्योग सुरू करा! शासन देत आहे एक लाख रुपये पर्यंत कर्ज ! लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे अर्ज करा !

Spread the love

बदलत्या काळानुसार शेती क्षेत्रामध्ये मोठमोठे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तरुण शेतकऱ्यांना आता शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देत आहे. त्यामध्येच आता शासन रेशीम शेती करण्यास तरुण वर्गाला प्रोत्साहित करत आहे. या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देत आहे.

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे यासाठी शासन शेतकऱ्यांना प्रेरित करत आहे. रेशीम कोषास आता 68 हजार रुपये पर्यंत भाव प्रति क्विंटल मागे मिळत असल्यामुळे ह्या शेतीपूरक व्यवसाय मधून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते. हेच शासनाचे उद्दिष्ट आहे.

पारंपारिक पद्धतीने शेती करत असताना शेतकऱ्यांना आता अनुभव आलाच असेल की खर्च वाढला आहे पण नफा कमी होत आहे. पण याला पर्याय म्हणून आपण पारंपरिक शेती सोबतच आधुनिक शेतीची सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो.

रेशीम शेती करण्यासाठी शासन एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देत आहे. सध्या बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे तरुण वर्गाने ह्या क्षेत्रात घुसणे गरजेचे आहे.

अशावेळी तुम्ही रेशीम उद्योग करण्यास सुरुवात केली तर ग्रामीण भागामध्ये राहून देखील तुम्ही चांगला रोजगार मिळू शकतात आणि या माध्यमातून तुमची आर्थिक बाजू बळकट होईल.

शेती करत असताना शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या येते ती म्हणजे योग्य ते भांडवल आपल्याकडे उपलब्ध नसते. पण आता भिऊन जायची काय गरज नाही. शासन तुम्हाला शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्या माध्यमातून तुम्हाला रेशीम उद्योग उभारणीवर एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकते. याबाबत बँकांनीही कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. या माध्यमातून शेतकरी बांधवांना बँका कर्ज उपलब्ध करून देणार आहेत.

शासनाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून रेशीम उद्योग सुरू करायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्या तालुक्यामधील कृषी कार्यालयामध्ये भेट द्या आणि त्या ठिकाणी अधिकारी साहेब असतील त्यांच्याकडून तुम्हाला रेशीम उद्योगा विषयी व कर्ज उपलब्धतेविषयी संपूर्ण मार्गदर्शन मिळेल.

नोकरीच्या शोधात असूनही नोकरी मिळत नसेल तर आता तुम्ही रोजगाराच्या मार्गाकडे वळावे असे ठरवून तुम्ही रोजगार मिळवण्यासाठी धावपळ करत असाल तर तुमच्यासमोर ही एक मोठी संधी आहे. शासन तुम्हाला मदत करणार आहे, तुमची तयारी आहे का? असेल तर त्वरित योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय सुरू करा.

Leave a Comment