Ayushman Bharat : आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार घ्या !

Spread the love

Ayushman Bharat Jan Arogya Card : प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेच्या कार्ड वितरणासाठी एक विशेष मोहीम राबवली आहे. आर्थिक दृष्ट्या जे नागरिक दुर्बल घटकांमध्ये मोडत आहेत अशा नागरिकांना मोफत आरोग्य उपचार मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवण्यात आले आहे.

या योजनेच्या माध्यमातून शासन जनतेला पाच लाख रुपये पर्यंतचे उपचार मोफत करून देईल. जिल्ह्यामधील सर्व भागांमध्ये जिल्हा परिषद गट यासोबतच पंचायत समिती गणामध्ये आयुष्यमान भारत व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड मोफत देण्याकरिता विशिष्ट मोहीम राबवले आहे.

उपलब्ध आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड लाभार्थी व्यक्तींना अगदी मोफत देण्याकरिता विशेष अशी शिबिर राबवली आहेत.

कोण करू शकतो अर्ज ?

आयुष्यमान भारत योजने करिता जे व्यक्ती अर्ज करतील त्यांचे वय हे कमीत कमी 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. जर कोणी स्वतःहून या योजनेसाठी अर्ज करत असतील तर सर्वात प्रथम व्यक्तीचे नाव आणि एसईसीसी-२०११ मध्येच असली पाहिजे सामाजिक यासोबतच आर्थिक व दुर्बल घटकातील पात्र जनतेला या योजनेचा लाभ घेता येईल. लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड व्यक्तींकडे असावे.

पाच लाखांपर्यंत मोफत उपचार

देशभरातील कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकते. यासोबतच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देखील योजनेअंतर्गत पुरवण्यात आले आहे. आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड सर्व नागरिकांना प्रदान करत आहे. या योजनेच्या माध्यमातून आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणारे नागरिक रुग्णालयामध्ये जाऊन चार लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकणार आहेत.

कोण असतील लाभार्थी

ग्रामीण भागातील नागरिक व शहरी भागातील नागरिक या योजनेचा फायदा घेऊ शकतील. ग्रामीण भागामध्ये पक्के खरे नसलेले यासोबतच कुटुंब प्रमुख महिला असलेले आणि कुटुंबामध्ये कोणी दिव्यांग व्यक्ती असलेले अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील नागरिक अर्ज करू शकतील.

यासोबतच मित्रांनो ग्रामीण परिसरामध्ये बेघर असणारी व्यक्ती निराधार व आदिवासी लोक कोणतीही प्रक्रिया न करता या योजनेचा लाभ घेऊ शकतील. त्यासोबतच शरीरातील नागरिकांसाठी काही तुरळक पात्रता शिथिल करण्यात आले आहे.

कॉम्प्युटर इंटरनेट सेवा यासोबतच विविध शिबिर घेण्याकरिता व्यवस्था करून दिल्यास आरोग्य शिबिर मित्रांना व्यवस्थितपणे शिबीर घेता येईल. शिबीर घेण्याकरिता कोणी इच्छुक असाल तर त्यांनी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या कक्षेमध्ये थेट संपर्क साधावा. असे आवाहन डॉक्टर अशोक गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Comment