Good News : कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ , सरकारकडून घेण्यात आला मोठा निर्णय !

Spread the love

भविष्य निर्वाह निधी योजना ( ईपीएस ) अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना आता वाढीव पेन्शन मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .वाढीव पेन्शनचा लाभ घेण्याकरीता निवृत्तीवेतनधारकांना 3 मार्च 2023 पर्यंत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत .या संदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सविस्तर प्रक्रिया प्रसिद्ध केली आहे .

सदरची वाढीव पेन्शनचा पर्याय कोणासाठी आहे ?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत ईपीएफओ मध्ये योगदान देणाऱ्यांना येत्या 3 मार्च पर्यंत वाढीव पेन्शनचा लाभ मिळविण्याकरीता पर्याय निवडण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे .दि.22.08.2014 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ( ईपीएस ) सुधारणा करुन पेन्शनची मर्यादा ही 6500/- वरुन 15,000/- रुपये करण्यात आलेली आहे .यामुळे 2014 पुर्वी सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता वाढीव पेन्शनचा लाभ घेण्याकरीता पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत .

कसा करावा लागेल अर्ज – वाढीव पेन्शनचा लाभ मिळविण्याकरीता ईपीएफओ कार्यालयामध्ये अर्ज सादर करावा लागेल . शिवाय ऑनलाईन पद्धतीने अर्ज उपलब्ध करुनही देण्यात आलेले आहेत .ऑनलाईन अर्ज सादर केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांस पावती क्रमांक प्राप्त होईल .ज्य कर्मचाऱ्यांनी या अगोदरच वाढीव पेन्शन करीता अर्ज सादर केला होता , परंतु प्रक्रिया अपुर्ण असल्यास अशा कर्मचाऱ्यांनी प्रादेशिक कार्यालयांमध्ये अर्ज सादर करायचे आहे .

ईपीएस ने घेतलेल्या या वाढीव पेन्शनच्या निर्णयामुळे पेन्शनमध्ये 6500/- रुपये वरुन 15,000/- रुपये अशी वाढ होणार आहे .यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment