Maharashtra News : राज्याच्या सत्तेत बदल झाल्यानंतर सत्तेमध्ये विराजमान झालेल्या सरकारने विविध महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. या निर्णयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सरकारने राबवण्यास सुरू केल्या आहेत. अशा मध्येच आता मित्रांनो शिंदे फडणवीस सरकार एक नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबवणार आहे. राज्यामध्ये आता एक कुटुंब एक ओळखपत्र अशी विशेष योजना राबवण्यात येणार आहे.
वास्तविकपणे बघायचे झाले तर हरियाणा राज्यामध्ये या योजनेस आरंभ झालेला आहे. आता आपल्या राज्यातही योजना सुरू केली जाईल. याविषयी केंद्रीय मंत्रालयात एक विशेष बैठक पार पाडली असुन या योजनेबाबत योग्य तो निर्णय घेतला गेला नसल्यामुळे ही योजना प्रलंबितच आहे. पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेच्या हितासाठी ही योजना राबवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतलेला आहे.
मित्रांनो सर्वात आधी जाणून घेऊया एक कुटुंब एक ओळखपत्र ही योजना नक्की काय आहे. या योजनेचा नागरिकांना नक्की फायदा काय होणार आहे. तर मित्रांनो आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, एक कुटुंब एक ओळखपत्र ही योजना सध्या महाराष्ट्रात राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील यासोबतच बंधारे मंत्री दादा भुसे यांनी या योजनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी हरियाणा राज्याचा दौरा पार पाडला.
या दोन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक विशिष्ट असे शिष्टमंडळ हरियाणामध्ये आयोजित करण्यात आले. त्यामध्ये त्याला याबाबत संपूर्ण माहिती दिली. यावेळी शिष्टमंडळाच्या माध्यमातून हरियाणाचे मुख्यमंत्री श्रीमान मनोहर लालजी कट्टर याची भेट देखील त्यांनी घेतलेली आहे. त्यावेळी त्यांनी देखील या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. हरियाणा राज्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेच्या अंतर्गत विविध योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.
एका कुटुंबासाठी या ओळखपत्राच्या माध्यमातून कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे एकच ग्राह्य धरले जाईल. याशिवाय जमीन, संपत्ती, वाहन, शिक्षण यासोबतच सामाजिक घटक इत्यादी माहिती यामध्ये नोंदवली जाईल. या ओळखपत्राच्या माध्यमातून जन्माची नोंद मागवण्यात येत आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पेन्शनचा लाभ देखील पात्र लाभार्थी नागरिकांना देण्यात येणार आहे. या ओळखपत्राच्या माध्यमातून आपण सुद्धा एक पेन्शन धारक नागरिक झालो आहोत त्यामुळे शासकीय योजना या सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी राज्य सरकारला एक मोठी मदत होणार आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना सुरू करण्याकरिता सध्याचे सरकार सकारात्मक बाजूने काम करत आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र मधील मंत्र्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली आहे. यासाठीचे दौरे देखील सुरू आहेत. यासंदर्भात एक विशेष अशी बैठक मंत्रालयात घेतली होती. या बैठकीमध्ये या योजनेबाबत चर्चा पूर्णपणे संपन्न झालेली असून आगामी काळामध्ये हरियाणात सूर असलेल्या या योजनेचे अनुकरण महाराष्ट्र राज्यात होईल. असे स्पष्ट दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस घेता येणार आहेत.
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !