माहीतीचा अधिकार अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत मिळालेली संपुर्ण माहिती ! सर्व बैठकीचे इतिवृत्त !

Spread the love

राज्य शासन सेवेत 2005 नंतर रुजु झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना नविन पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे . या पेन्शन योजनेमध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत .याबाबत श्री.योगेश पखाले , अमरावती यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळणेबाबत ऑनलाईन अर्ज दाखल केला होता . या अंतर्गत राज्याच्या वित्त विभागाकडुन माहिती मिळालेली आहे .

आत्तापर्यंत राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत तसेच राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये बदल करण्याकरीता राज्य शासनाच्या मंत्रीमंडळाच्या अनेक बैठका आयोजित केले गेले आहेत .राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या त्रुटीचा अभ्यास तसेच जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत दि.11.06.2019 रोजी राज्य शासनाच्या मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती .या बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतची धोरण ठरविण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता .

त्याचबरोबर दि.20 ऑगस्ट 2019 रोजी मा.राज्यमंत्री यांच्य अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये राज्य कर्मचारी सेवेत असताना मृत्यु पावल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मृत्यू नि- सेवा उपदानाचा लाभ मिळणेबाबतची मागणी करण्यात आली .त्याबाबर येणारा आर्थिक भार तपासून त्यानंतर या संदर्भात निर्णय घेणे ग्राह्य धरण्यात आले .

दि.04.10.2021 रोजी मा.राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या सेवेत दि.01.11.2005 रोजी व त्यांनतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना बंद करुन जुनी पेन्शन योजना लागु करावी अशी मागणी करण्यात आली .तसेच माजी सैनिक साधारण: वयाच्या 47 ते 52 व्या वर्षी राज्य शासनाच्या सेवेत रुजु होतात त्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीनंतर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत कमी आर्थिक लाभ होत असल्याने त्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागु करवी असे विविध मुद्दे मांडळण्यात आले .

माहितीचा अधिकार अंतर्गत मिळालेली संपुर्ण माहिती / आत्तापर्यंत जुनी पेन्शन संदर्भात झालेल्या सर्व बैठकीचे इतिवृत्त पाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन डाऊनलोड करुन शकता .

CLICK HERE

कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment