महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे निकाल जाहीर झालेले असून , या निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीचा केवळ एकच उमेदवार निवडुण आला आहे . तर जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या बाजुने मत मांडणारे उमेदवार प्रचंड मतांने निवडूण आलेले आहेत .सहापैकी 4 उमेदवार हे महाविकास आघाडी पक्षाचे तर एक अपक्ष व एक भाजपाचा असा निकाल विधानपरिषदेचा लागला आहे .
राज्यातील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन याच मुद्यांवर मतदान केले आहेत , महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांनी जुनी पेन्शनचा मुद्दा अधिकच जोर धरला होता . यामुळे महाविकास आघाडी सरकारला या निवडणूकींमध्ये चांगले यश मिळाले आहे . परंतु यापुर्वी महाविकास आघाडी सरकारची सत्ता असतांना देखिल राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आलेली नव्हती .
यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना केवळ आणि केवळ आश्वासनेच दिली जात आहेत . कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा फायदा केवळ मतांसाठी केला जात असुन , कर्मचाऱ्यांचे प्रश्न मात्र असेच प्रलंबित राहत आहेत .
जुनी पेन्शन बाबत मंत्रालयीन हालचाली –
शिंदे -फडणवीस सरकारकडुन जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत शिक्षण विभागांकडुन अभ्यास समिती गठीत करुन अभ्यास सुरु असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे . परंतु जुनी पेन्शन वित्त विभागांकडुन ठोस कोणत्याही हालचाली सुरु नसल्याची गुपित माहिती समोर आलेली आहे .
कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !