महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रेवार्षिक अधिवेशन नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे पार पडले . या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी जुनी पेन्शन सह शिक्षकांच्या विविध प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत उपस्थित शिक्षकांना आश्वासित केले .
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले कि ,राज्यात शिक्षकांच्या तब्बल 30 हजार जागा भरण्यासाठी सरकारकडून वेगवान हालचाली सुरु आहेत .त्याचबरोबर शिक्षकांना शाळाबाह्य कामांचे प्रमाण कमी करण्यात येईल .व नविन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यार्थी व विद्यार्थींना समान व उच्च दर्जांचे शिक्षण देण्यास राज्य शासनाकडून महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत . यामध्ये राज्यातील शिक्षक उत्तम पद्धतीने काम करत आहे याबाबत मुख्यमंत्रीकडून कौतुकाची थाप देण्यात आली .
यावेळी शिक्षकांनी जुनी पेन्शनबाबत प्रश्न विचारले असता , मुख्यमंत्र्यांनी सांगितले कि , जुनी पेन्शन बाबत मंत्रालयीन स्तरावर काम सुरु असून , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्यास राज्य सरकार कटीबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .जुनी पेन्शनवर सध्या राज्य सरकारकडून सखोल चर्चा सुरु असून , टप्याटप्याने हा प्रश्न सोडविला जाईल .अशी आशा यावेळी मुख्यमंत्री यांनी उपस्थित शिक्षकांनी दिली .
कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- अधिकारी / कर्मचारी वेतन व भत्ते अदा करणेबाबत दि.28.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांचे हिवाळी अधिवेशन काळात विधीभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चा !
- सिबिल स्कोअर कमी असेल तर चिंता करू नका; असे घ्या त्वरित कर्ज? फॉलो करा या टिप्स-
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाखो कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! वाढीव महागाई भत्त्यासोबत मिळणार या कर्मचाऱ्यांना बोनस;
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !