Old Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , आली आत्ताची मोठी अपडेट !

Spread the love

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन हा मुद्दा अधिकच चर्चेचा विषय ठरला आहे .देशातील अनेक राज्य नविन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शनचा लाभ कर्मचाऱ्यांना पुर्ववत करत आहेत .याबाबत केंद्राकडुन आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे .

जुनी पेन्शन लागु केल्यास 2023 पर्यंत देश होईल दिवाळखोर – मा.मनोहर लाल खट्टर

जर सन 2004 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शनचा लाभ पुर्ववत लागु केल्यास , देशाच्या गंगाजळीमध्ये सर्वात मोठी तफावत दिसेल . तर सन 2023 पर्यंत भारत देश हा दिवाळखोर होईल . असे वक्तव्य हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटले आहे .जर जुनी पेन्शन लागु केल्यास संबंधित राज्य व देशांची प्रगतीही खुंटावेल , त्याचबरोबर देशाचे माजी पंतप्रधान यांनी देखिल जुनी पेन्शनला विरोध केला होता असे त्यांनी यावेळी नमुद केले आहे .

सध्या या 4 राज्यांनी लागु केली जुनी पेन्शन योजना – देशातील छत्तीसगड , राजस्थान , पंजाब ,हिमाचल प्रदेश , तर पश्चिम बंगाल मध्ये पुर्वीपासुनच जुनी पेन्शन योजना लागु आहे .जुनी पेन्शनबाबत दिल्ली , अरुणाचल प्रदेश ,व महाराष्ट्र राज्य सरकार देखिल जुनी पेन्शन लागु करणेबाबत सकारात्मक भुमिका घेत आहेत .

जुनी पेन्शन कर्मचारी हिताची – जुन्या पेन्शनप्रमाणे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळेसची शेवटच्या मुळ वेतनाच्या निम्मी रक्कम पेन्शन म्हणून मिळते . तर नविन पेन्शन प्रमाणे किमान 5 हजार रुपये देखिल पेन्शन मिळणे अवघड आहे . यामुळे जुनी पेन्शन ( Old Pension ) ही कर्मचाऱ्यांच्या हिताची आहे .

कर्मचारी विषयक , पदभरती योजना व ताज्या बातम्यांच्या अपडेट साठी जॉईन Whatsapp ग्रुप

Leave a Comment