जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी देशातील कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलनाची घोषणा

Spread the love

जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी एकत्रित देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे . या संदर्भातील माहिती अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लांबा यांनी रविवारी शंकरनगर स्थित कर्मचाऱ्यांचा विदर्भस्तरीय मिळवा दरम्यान सांगितले आहे .

राज्य शासन सेवेतील सरकारी कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी दिनांक 14 मार्चपासून जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी राज्यव्यापी संपावर जाणार आहेत या संपाला देशव्यापी कर्मचारी संघटनांचा समर्थन येत असून देशामध्ये एकत्रित देशातील सर्व कर्मचारी संघटना एकत्र येऊन देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे . दिनांक 10 मार्च पासून सर्व राज्यांमध्ये माहे जून पर्यंत देशातील सर्व जिल्हे तालुके यामध्ये कर्मचाऱ्यांचे मेळावे घेण्यात येणार आहेत . त्याचबरोबर माहे जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांकडून रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे . यामध्ये देशातील सर्व गावांना भेट देऊन दिनांक 3 नोव्हेंबरला देशातील सर्व कर्मचारी दिल्ली येथे पोहोचणार आहे . त्या ठिकाणी सर्व कर्मचारी एकत्रित येऊन भव्य आंदोलन करणार आहेत .

देशव्यापी आंदोलनास राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्कर्स आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आदी संघटनांनी देशव्यापी आंदोलनामध्ये सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे

यामुळे जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा आता देशपातळीवरचा मुद्दा झालेला आहे . देशातील कर्मचारी एकाच वेळेस बेमुदत संपावर जाणार असल्याने सरकारला जुनी पेन्शनबाबत योग्य तो निर्णय घ्यावाच लागणार आहे .

कर्मचारी विषयक / भरती योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा

Leave a Comment