Breaking News : राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या नियमामध्ये  01 एप्रिल नंतर होणार मोठा बदल !

Spread the love

सन 2004 नंतर केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखिल राष्ट्रीय पेन्शन प्रणाली लागु करण्यात आलेली आहे .सदर राष्ट्रीय पेन्शन प्रणालींमध्ये वेळोवेळी काही बदल होत असतात .यामध्ये नेमके कोणकोणते बदल झालेले आहेत ,बदललेल्या नियमांनुसार योगदान देणाऱ्या सदस्यांना काय करावे लागणार आहे .या बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .

दि.01 एप्रिल 2023 पासुन राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केला जाणार आहे .या बदललेल्या नियमांनुसार , सदस्यांना काही कागतपत्रे जमा करणे बंधनकारक ठरणार आहेत , जे सदस्य सदर आवश्यक कागतपत्रे जमा करणार नाहीत , अशा सदस्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून पैसे काढता येणार नाहीत .यामध्ये सांगण्यात आलेले आहेत कि , सदस्यांनी केवायसी कागतपत्रे देणे बंधनकारक आहेत . याशिवाय सदस्याना पैसे काढता येणार नाहीत .

KYC करीता कोणती कागदपत्रे लागतील ?

केवायसी भरण्या अगोदर आपल्या अर्जामध्ये बँक खाते  , पॅन कार्ड , ओळखीचा पुरावा , प्रान क्रमांन किंवा पर्मनेंट रिटायरमेंट खात्याची नोंद् असणे आवश्यक आहे .त्यासोबत आधार कार्डची नोंद असणे आता आवश्यक असणार आहे , KYC करीता आधार कार्ड हे ग्राह्य धरण्यात येणार आहे .

असे आहेत NPS मधून पैसे काढण्याचे नियम – योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यास 60 टक्के रक्कम पदर करण्यात येते . व उर्वरित 40 टक्के रक्कमेवर पेन्शन देण्यात येते . या अगोदर हे उलट होते , परंतु सदस्यांचे विचार करुन यामध्ये योग्य तो बदल करण्यात आला आहे .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी व्हाट्सएप ग्रुप मध्ये सामील व्हा

Leave a Comment