NPS : राष्ट्रीय पेन्शन योजनेतील ह्या गोपनिय जाचक अटी आपल्याला माहित आहेत का ?

Spread the love

सन 2004 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने अधिसूचना काढून राष्ट्रीय पेन्शन योजना लागु केली आहे . केंद्र सरकारच्या या निर्णयनंतर देशातील पश्चिम बंगाल सोडून सर्वच राज्यांनी या राष्ट्रीय पेन्शन योजनेचा स्विकार केला आहे . महाराष्ट्र राज्य सरकारने देखिल सन 2005 साली अधिसूचना काढून नोव्हेंबर 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली .

राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन तर मिळतच नाही . परंतु या योजनेच्या माध्यमातुन कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ घेण्याकरीता अनेक गोपनिय जाचक अटी घालण्यात आलेल्या आहेत . यामध्ये काही गोपनिय जाचक अटी पुढीलप्रमाणे पाहुयात .

जमा योगदानाच्या रक्कमेपैकी फक्त 20% रक्कम काढता येणार –

कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास कर्मचाऱ्यांस राष्ट्रीय पेन्शन योजनेत जमा असणाऱ्या रक्कमेपैकी केवळ 20 टक्केच रक्कम काढता येते . जे कि , जुन्या पेन्शनमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील रक्कम केव्हाही काढू शकतो . शिवाय सेवानिवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधी खात्यातुन 100 टक्के रक्कम काढू शकतो .परंतु राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून केवळ 20 टक्के रक्कमच काढू शकतो .

जमा रक्कम केवळ वारसांना मिळणार – राष्ट्रीय पेन्शन योजनेतील जमा रक्कम कर्मचाऱ्यांस मिळणार नाही . जमा रक्कमेवर अवलंबून कर्मचाऱ्यांस पेन्शन मिळेल . कर्मचाऱ्याची इच्छा असताना देखिल राष्ट्रीय पेन्शन मधील जमा रक्कम काढू शकणार नाहीत .जमा रक्कम ही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना सदरची रक्कम मिळेल .

जमा रक्कमेच्या व्याजावर आधारित पेन्शन व्यवस्था – राष्ट्रीय पेन्शन योजना ही एक व्याजावर आधारित पेन्शन योजना आहे . बँकेमध्ये मुदत ठेव केल्यानंतर जे व्याज मिळते त्याच पद्धतीने ही रक्कम आपल्या जमा रक्कमेवर व्याज स्वरुपात पेन्शन मिळते .

कर्मचाऱ्यांच्या जमा रक्कमेमध्ये सरकारचे योगदान असते , यामुळे कर्मचाऱ्यांना सदर जमा रक्कमेतुन कधीच पैसे काढता येणार नाहीत . केवळ जमा रक्कमेवर पेन्शन मिळेल , अशा पद्धतीने ही पेन्शन व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या अपडेट साठी whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा .

Leave a Comment