Lok Sabha Elections : 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या विजयी पक्षाचा झेंडा फडकेल! सर्वेक्षणातून समोर आली ही धक्कादायक बाब !

Spread the love

भारत देशामध्ये सध्या भाजपची सत्ता कार्यरत असून येणाऱ्या 2024 मधील 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीकरिता सर्वच सत्ता आपला पाया भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये आता काँग्रेस पक्ष देखील भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत आहे.

Lok Sabha elections : अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी निवडणूक आता 2024 मध्ये होईल त्यामध्ये नक्की कोणी बाजी मारेल यावर सध्या सर्वांसमोरच प्रश्नचिन्ह उभे आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टी विजयी होण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांमध्ये विश्वास जागृत करत आहे.

काँग्रेस पक्षाने आता भारत जोडो यात्रेचा पाठिंबा घेतला असून आता 2024 मध्ये निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकेल यावर आता सर्वांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मित्रांनो इंडिया टुडे-सीव्होटर मूड ऑफ द नेशन (एमओटीएन) सर्वेक्षणात याबाबतचे उत्तर समोर आलेले आपल्याला दिसून आले आहे.

जर आज निवडणुका झाल्या तर भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए 298 जागा जिंकण्याची शक्यता दिसत आहे. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसच्या नेतृत्व अंतर्गत युपी मध्ये 153 जागा ते मिळू शकतात असा देखील अंदाज आपल्यासमोर आला आहे.

यासोबतच शिल्लक 92 जागा या इतर जे पक्ष आहेत. त्या खात्यात जाऊ शकतील व त्याच्या टक्केवारी बद्दल बघितले तर एनडीएला 43 यूपीएला 30 व इतर पक्षांना 27 टक्के मत मिळण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए आता प्रत्यक्षपणे 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकण्याच्या स्थितीला असल्याचे आपल्याला दिसून आले आहे. तरी पण पुढे कमी होत चालली जागा एनडीए करिताचे त्याची बाब ठरत आहे.

मित्रांनो एनडीएच्या 298 जागांचा जो काही आकडा आहे तो सहा महिन्यांपूर्वीच्या सर्वेक्षण अंदाजापेक्षा कमी आहे. पण दुसरीकडे बघितले तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएने सत्तेमध्ये परत आल्यानंतर ज्या जिंकलेल्या जागा होत्या त्याच्या तुलनेत 50 पेक्षा जास्त जागा कमी होत असताना आपल्याला दिसून आले आहेत.

जर विविध पक्षांनुसार जागांवर नजर आपण टाकली तर सर्वेक्षणामध्ये भाजपला 285 काँग्रेसला 68 व इतर पक्षांना 191 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे. या माध्यमातून सर्वेक्षणामध्ये भाजपला स्वबळावर शासन स्थापन करण्याकरिता आवश्यक असलेल्या 272 जागांपैकी स्पष्ट बहुमतापेक्षाही अधिक बारा जागा मिळवणे बंधनकारक राहणार आहे.

भाजपच्या अडचणीत वाढ

केंद्र शासनाच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची चिन्हे आपल्याला दिसून आले आहेत. कारण जानेवारी 2023 मधील MOTN सर्वेक्षणामध्ये त्यांच्या बहुमतामध्ये सातत्याने घट पायाला मिळत आहे. यासोबतच अनेक विविध राज्यांमध्ये भाजप पक्षासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

जर पंतप्रधानाच्या उमेदवारीवर ममता बॅनर्जी बसल्या तर बंगाली अस्मितेला राजकीय निवडणुकीचा मुद्दा बनवला जाईल व पश्चिम भागांमध्ये भाजपच्या 41 जागांपैकी अंदाजे 20 जागा कमी होतील.

तसेच तेलंगणामध्ये देखील आपल्याला असे पाहायला मिळू शकते अशी तरतूद मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणत पंतप्रधानाच्या शर्यतीमध्ये उतरले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता भाजपला अंदाजे एकूण सहा जागा मिळणे कठीण झाले आहे.

यूपीमध्ये देखील अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने यांच्या राज्याच्या राजकीय पटलावर पुन्हा उभे राहिले आहेत. एकूण 80 जागांपैकी 70 जिंकणे कठीण होऊ शकते.

महाराष्ट्र राज्यामध्ये 48 जागा बिहारमध्ये 40 जागा यासोबतच दोन मोठ्या राज्यांमध्ये ही भाजपला अडचणींचा सामना करावा लागेल अशी शक्यता दिसत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस गट यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जोरात पाऊस टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला मोठे नुकसान सहन करावे.

बिहारमध्ये सुद्धा यंदाच्या वेळी नितीश कुमार यांच्या जेडीयू चा पाठिंबा भाजप स्वतःला मिळाला नाही दुसरीकडे मागील वर्षापूर्वी कर्नाटकामध्ये 28 जागांपैकी 25 जागा जिंकल्यानंतर भाजप सत्ता या ठिकाणी पूर्वीच बॅकफूटवर आलेले दिसत होती.

मित्रांनो हे सर्वेक्षण सी वोटर ने केले असून आता पंधरा डिसेंबर पासून 15 जानेवारी पर्यंतच्या दरम्यान झालेल्या सर्वेक्षणामध्ये 36 हजार लोकांच्याकडून त्यांचे मते जाणून घेतली याचवेळी सी वोटर च्या माध्यमातून नियमित ट्रॅकर डेटा गोळा करून 5000 लोकांच्या नमुन्याचाही त्या ठिकाणी विश्लेषण केले या माध्यमातून एक लाख 40 हजार लोकांची मते या सर्वेक्षणात समाविष्ट झाली आणि त्यामधून हा निकाल पुढे आला.

Leave a Comment