नोकरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना व विद्यार्थीनींना मासिक पाळीच्या काळात सुट्टीची मागणी ! याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे विधान !

Spread the love

देशातील सर्वच नोकरी करत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर विद्यार्थीनींना मासिक पाळीच्या काळांमध्ये विशेष रजेची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रिम कोर्टाने स्विकारण्यास नकार दिलेला आहे .सदरची बाब ही वैधानिक असून याकरीता धोरणात्मक बाबी सरकार समोर मांडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीचे रहीवासी असणारे शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी सुप्रिम कोर्टांमध्ये नोकरी करणाऱ्या देशातील सर्वच महिला कर्मचारी त्याचबरोबर विद्यार्थीनींना मासिक पाळीच्या काळांमध्ये सुट्टीची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती .यामध्ये शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी नमुद केले होते कि , मातृत्व लाभ कायदा 1961 च्या कलम 14 चे पालन करण्यासाठी केंद्र व देशातील सर्व राज्यांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आलेली आहे .

मासिक पाळीच्या काळांमध्ये महिलांना अनेक समास्यांना सामोरे जावे लागते , यामुळे मासिक पाळीच्या काळांमध्ये विशेष सुट्टीची आवश्यक आहे .याचिकेमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , चीन , वेल्स , जपान ,इंडोनेशिया , दक्षिण कोरिया , स्पेन , झांबिया तसेच युके अशा देशांमध्ये महिलांना विशेष मासिक सुट्टीची तरतुद करण्यात आलेली आहे .त्यानुसार भारतांमध्ये देखिल महिलांच्या सुरक्षिता व आरोग्याचा विचार करुन सदरचा निर्णय घेणेबाबत याचिका दाखल करण्यात आलेली आहे .

कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment