राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन / अतिकालिक भत्ता निवृत्तीवेतन इत्यादी बाबींना अर्थसंकल्पीय निधी वितरण करणेबाबत वित्त विभागाकडुन GR निर्गमित ! GR दि.08.02.2023

Spread the love

सन 2022-23 मधील निधी वितरण करणेबाबत वित्त विभागाकडुन दि.08 फेब्रुवारी 2023 रोजी महत्वपुर्ण शासन शासन निर्णय निर्गमित झाला असून .सन 23022-23 च्या प्रथम नऊमाहिकरीता आवश्यक असणारा अनिवार्य व कार्यक्रमांतर्गत खर्चाचा अर्थसंकल्पीय निधी एकुण वार्षिक तरतुदीच्या 60 टक्केच्या मर्यादेत अर्थसंकल्पीय अंदाज , वाटप आणि संनियंत्रण वितरीत करण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्य आहेत .

सन 2022-23 चे सुधारित अंदाज निश्चित करण्याची कार्यवाही सुरु असून सुधारित अंदाज निश्चित होईपर्यंतच्या कालावधीसाठी विभागास आवश्यक असणाऱ्या खर्चासाठी निधीची गरज लक्षात निधी वितरणाची मर्यादा निश्चित करण्यात येत आहे . त्याप्रमाणे निधी अर्थसंकल्पीय अंदाज , वाटप आणि संनियंत्रण प्रणालीवर वितरीत करण्यास सहमती देण्यात येत आहे .

यामध्ये वेतन या उद्दिष्टासाठी 95 टक्के तर मजुरी या उद्दिष्टा करीता 95 टक्के तर अतिकालिक भत्ता करीता 80% त्याचबरीोबर कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या सेवेवरील खर्चाकरीता 90 टक्के निधी खर्चास मान्यता देण्यात येत आहे . तसेच शिष्यवृत्या / विद्यावेतन या उद्दिष्टाकरीता 95  टक्के निधी वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे .तर सहाय्यक अनुदाने अदा करण्यास 100  टक्के निधींचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे .

सदर निधी कोणत्याही परिस्थितीत खर्च न होता त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय अधिकारी / मंडळे / महामंडळे यांच्या बँक खात्यात , स्वीय प्रपंजी खात्यात अथवा शासकीय लेखाबाहेर ठेवता येणार नाही अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Comment