महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियमांमध्ये , सुधारणा करणेबाबत वित्त विभागांकडुन अखेर अधिसूचना निर्गमित !

Spread the love

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेत 309 च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित नियम , 2009 मध्ये सुधारणा करण्यात आले आहेत . याबाबत वित्त विभागाकडुन दि.03 फेब्रुवारी 2023 रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे .याबाबतची सविस्तर सुधारती नियमावली पुढीलप्रमाणे पाहुयात ..

या सुधारित नियमांना आता महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2022 असे संबोधण्यात येईल .महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2009 मधील नियम 7 च्या पोटनियम पोटकलम नंतर पुढील पोटकलम दाखल करण्यात येत आहे आणि ते दि.01.01.2006 पासून दाखल करण्यात येत आहे .

सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार सरळसेवेने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ज्या पदावर दि.01.01.2006 रोजी / त्यानंतर या नियमांच्या जोडपत्र तीन नुसार सेवाप्रवेश वेतन अनुज्ञेय ठरणार आहे . अशा पदांवर दि.01.01.2006 पुर्वी नामनिर्देशनाने अथवा पदोन्नतीने नियुक्त झालेल्या आणि दि.01.01.2006 रोजी पोटनियम कलम ( अ ) च्या अन्वये वेतननिश्चिती केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन , सरळसेवा नियुक्तींसाठी जोडपत्र तीन मध्ये विहीत केलेल्या सेवाप्रवेश वेतनापेक्षा कमी निश्चित होत असेल तर ते दि.01.01.2006 पासून उंचावून देण्यात येणार आहेत . ज्यामुळे अशा सेवाप्रवेश वेतनापेक्षा ते कमी असणार नाही .

महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2009 मधील नियम 13 च्या पोटनियम ब नंतर पुढील पोटनियम दाखल करण्यात येत आहे आणि तो दि.01.01.2006 पासून अंमलात आल्याचे मानण्यात येणार आहे .सेवाप्रवेश नियमातील  तरतुदीनुसार सरळसेवेतने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ज्या पदावर दि.01.01.2006 रोजी किंवा त्यानंतर या नियमांच्या जोडपत्र तीन नुसार सेवाप्रवेश वेतन अनुज्ञेय ठरते .

अशा पदांवर दि.01 जोनवारी 2006 रोजी किंवा त्यानंतर पदोन्नतीने नियुक्त झालेल्या आणि पोटनियम अ नुसार वेतननिश्चिती केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन , विहीत केलेल्या उक्त वेतनापेक्षा कमी निश्चित होत असेल तर ते दि.01.01.2006 रोजी किंवा त्यानंतरच्या त्याच्या पदोन्नतीच्या दिनांकापासून उंचावून देण्यात येणार आहे ज्यामूळे ते अशा सेवाप्रवेश वेतनापेक्षा कमी असणार नाही .

या संबंधी वित्‍त विभागाकडुन दि.03.02.2023 रोजी निर्गमित झालेली अधिसूचना डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन अधिसूचना

कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment