राज्यातील वर्ग -3 व वर्ग – 4 च्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

राज्य शासन सेवेतील वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागु करण्याबाबत ग्रामविकास विभागांकडून दि.06 मार्च 2019 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोागानुसार सुधारित वेतन संरचना लागु करण्यात आलेल्या आहेत .

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील कलम 248 च्या परंतुकानुसार अनुज्ञेय असलेल्या अधिकारांनुसार तसेच उपलब्ध अन्य अधिकारांचा वापर करुन शासन असे आदेश दिले आहेत कि , महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2019 मधील वेतन निश्चितीचे नियम अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा मधील सुधारित वेतन संरचना व वेतननिश्चितीचे नियम तसेच  वेतन निश्चिती व थकबाकी अदा करण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या सूचना जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागु करण्यात येत आहेत .

सुधारित वेतन संरचनेत वेतननिश्चिती करण्यासाठी आवश्यक तो विकल्प हे आदेश निर्गमित झाल्याच्या दोन महिन्यांच्या आत देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .सदचे सुधारित वेतनस्तर हे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना दि.01 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आले आहेत .

सदर निर्णयांमध्ये पदांनुसार सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर / ग्रेड पे व सातव्या वेतन आयोागानुसार सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतनस्तर नमुद करण्यात आलेले आहेत .जिल्हा परिषदेमधील विभागनिहाय पदे व सुधारित वेतनस्तर पाहण्याकरीता ग्राम विकास विभागाचा दि.06.03.2019 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment