महाआंदोलनास सुरुवात  : जुनी पेन्शन लागु करा अन्यथा देशातील रेल्वे बंद करण्याचा कर्मचारी संघटनेचा इशारा !

Spread the love

जुनी पेन्शनच्या मागणीकरीता आता केंद्रीय कर्मचारी अधिक आक्रमक झालेले आहेत .पश्चिम रेल्वे कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकाराने मुलाखती घेतल्या असता , सांगितले कि केंद्रीय रेल्वे कर्मचारी जुनी पेन्शनच्या मागणीकरीता लवकरच महासंपावर जाणाार आहेत , शिवाय रेल्वे प्रवासी वाहतुक देखिल ठप्प करण्याचे धमकी शासनाला दिली आहे .

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दि.01 जानेवारी 2004 पासून जुनी पेन्शन योजना रद्द करुन नविन राष्ट्रीय पेन्शन योजना लागु केलेली आहे . ही योजना पुर्णपणे फसवी असून , कर्मचाऱ्यांना केवळ तुटपुंजी पेन्शन मिळत आहे .यामुळे या नविन राष्ट्रीय पेन्शन योजनेस देशातील सर्व केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहेत .सध्या काही राज्य जुनी पेन्शन लागु करण्याच्या तयारीत आहेत , परंतु केंद्राच्या दडपशाहीमुळे निर्णय घेवू शकत नाहीत , कारण देशांमध्ये बहुतांश राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे .

ज्या राज्यांमध्ये काँग्रेस , आम आदमी पार्टीची सत्ता आहे अशा राज्यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे .महाराष्ट्र राज्य सरकार देखिल जुनी पेन्शनबाबत सकारात्मक असून , याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत .

केंद्रीय रेल्वे कर्मचारी संघटनांकडून जुनी पेन्शन योजना बाबत आक्रमक भुमिका घेण्याच्या तयारीत असून , केंद्र सरकारने जुनी पेन्शन बाबत योग्य निर्णय न घेतल्यास , देशांतील रेल्वे सूविधा पुर्णपणे बंद करण्याचा इशाराच केंद्र सरकारला दिलेला आहे . यामुळे आता केंद्र सरकारकडून याबाबत कोणता निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे .

कर्मचारी विषयक , शासकीय पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment