Government Scheme : केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकासाठी कोणती ना कोणती योजना राबवत असते. त्या योजनांचा फायदा अनेक लोकांनी घेतला आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारून त्यांचे जीवनमान उंचावावे हेच केंद्र शासनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला शासनाची एक महत्त्वाची योजना माहीत असायलाच पाहिजे. त्या योजनेचे नाव आहे किसान क्रेडिट कार्ड योजना. होय सरकारी या योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून अत्यंत अल्पवयासदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देत असते. आता शेतकऱ्यांना स्वस्तात कर्ज देण्याचा हा एक महत्त्वाचा उद्देशच त्यांनी आकला आहे. शेतकऱ्यांना शेती करत असताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. या गोष्टीवर विचार करून त्यांनी ही योजना राबवली आहे. किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून जवळपास दोन टक्के ते चार टक्के व्याजदर आकारला जातो. शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजून किसान क्रेडिट कार्ड काढली नसेल तर चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
किसान क्रेडिट कार्ड कोणत्याही बँकेत बनवता येते!
शेतीशी संबंधित असणारी कोणतीही व्यक्ती या शासकीय कर्जाकरिता कोणत्याही शासकीय बँकेच्या शाखेत संपर्क साधू शकते. तुमचे किसान क्रेडिट कार्ड तयार झाल्यानंतर बँक शेतकऱ्यांना जमिनीच्या किंवा आपल्या गरजेप्रमाणे सहज कर्ज उपलब्ध करून देते. बँकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जाची कमाल मर्यादा ही तीन लाख रुपये आहे. आज काल बँका गावोगावी जाऊन शिबिर लावत आहेत. आणि शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देत आहे. मग तुम्ही का अजून लाभ घेतला नाही त्वरित लाभ घ्या त्यासाठी किसान क्रेडिट कार्ड काढा.
किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरिता सर्वात प्रथम पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या आणि किसान क्रेडिट कार्ड योजनेचा फॉर्म दिसेल तो फॉर्म डाऊनलोड करून घ्या. तो अर्ज योग्य रित्या भरून कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडा आणि आपल्या जवळील बँक शाखेमध्ये तो अर्ज सबमिट करा. तुमचे किसान क्रेडिट कार्ड काही दिवसातच तयार होईल आणि त्यानंतर तुम्हाला बँक पैसे देईल.
- अधिकारी / कर्मचारी वेतन व भत्ते अदा करणेबाबत दि.28.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांचे हिवाळी अधिवेशन काळात विधीभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चा !
- सिबिल स्कोअर कमी असेल तर चिंता करू नका; असे घ्या त्वरित कर्ज? फॉलो करा या टिप्स-
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाखो कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! वाढीव महागाई भत्त्यासोबत मिळणार या कर्मचाऱ्यांना बोनस;
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !