पेन्शन योजनेमध्ये मोठा बदल ! अखेर मोदी सरकार नरमले नवीन पेन्शन योजनेमध्ये मोठी सुधारणा !

Spread the love

महागाई बेरोजगारी त्याचबरोबर विविध मुद्द्यांवर विरोधकाकडून केंद्र सरकारमधील मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात येत आहे ,यातच नवीन पेन्शन योजना व जुनी पेन्शन योजना या मुद्द्यावर राज्य व केंद्र सरकार यांच्यामध्ये मोठा वाद सध्या पाहायला मिळत आहे .

केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्यास स्पष्ट विरोध दर्शवला असला तरी , अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे . जे राज्य सरकार जुनी पेन्शन योजना लागू करेल , अशा कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेमधील जमा पैसे परत केले जाणार नाहीत , अशी भूमिका केंद्र सरकारकडून घेण्यात आलेली होती . परंतु आता मोदी सरकार थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे . आता केंद्र सरकारकडून नवीन पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आली आहे .

नवीन पेन्शन योजना मध्ये जुन्या पेन्शन प्रमाणे लाभ त्याचबरोबर इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देणे बाबत केंद्राकडून दिलासादायक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे .नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर 60 टक्के रक्कम परत करण्यात येते व उर्वरित 40 टक्के रकमेवर पेन्शन दिली जाते . जुनी पेन्शन प्रमाणे एखाद्या कर्मचाऱ्यांचे शेवटचे मूळ वेतन 80 हजार असेल अशा कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीनंतर 40000 पेन्शन मिळते . परंतु नवीन पेन्शन प्रमाणे त्या कर्मचाऱ्यास केवळ 1000 ते 5000 रुपये पर्यंतच पेन्शन मिळत आहे , यामुळे कर्मचाऱ्यांचा रोष अधिकच वाढत आहे .

परंतु आता केंद्र सरकारकडून नवीन पेन्शन योजनेमध्ये बदल करण्यात येणार आहे ,यामुळे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे इतर सोयी सुविधांचा लाभ मिळणार आहे .

कर्मचारी विषयक /भरती /योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment