खुशखबर : सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने 42% दराने DA लागु करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !

Spread the love

केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची मोठी खुशखबर समोर आलेली आहे . ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून पुर्वीलक्षी प्रभावाने महागाई भत्ता मध्ये वाढ लागु करण्यात आलेली आहे . याबाबत केंद्र सरकारकडुन अधिकृत्त निर्णय घेण्यात आलेला आहे . याबाबतची आत्ताची सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात ..

माहे जानेवारी 2023 पासून पुर्वलक्षी प्रभावाने 42% DA वाढ !

माहे जानेवारी 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुर्वलक्षी प्रभावाने महागाई भत्ता मध्ये 4 टक्के वाढ करण्यात आली आहे . सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दरांने महागाई भत्ता मिळत आहे , यामध्ये केंद्र सरकारने चार टक्के वाढ केल्याने , आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 42 टक्के दरांने डी.ए मिळणार आहे .हा वाढीव महागाई भत्ता हा केंद्रीय कामगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या AICPI च्या निर्देशांकानुसार जाहीर करण्यात आलेला आहे .

सदरचा वाढीव चार टक्के महागाई भत्ता पुढील महिन्यांपासून प्रत्यक्ष वेतनासोबत अदा करण्यात येणार असून , माहे जानेवारी व फेब्रुवारी 2023 या दोन महिन्यातील डी.ए फरक देखिल रोखीने वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे .यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये मोठी वाढ होणार आहे , हा वाढीव डी.ए निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना देखिल माहे जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येणार आहे .

राज्यातील कर्मचाऱ्यांना देखिल केंद्र सरकारच्या धर्तीवर हा वाढीव चार टक्के महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करणेबाबत राज्य शासनाकडुन लवकरच मोठा निर्णय घेण्यात येणार आहे .

कर्मचारी विषयक पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment