सरकारने दिली कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर ! 18 महिन्यांच्या डीए थकबाकी बाबत सरकारचा मोठा निर्णय !

Spread the love

केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना महामारीमुळे 18 महिने काळातील डीए वाढीचा लाभ दिला नव्हता .या अठरा महिने डीए बाबत सरकारकडून मोठा निर्णय होणार आहे , यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .

केंद्रीय जेसीएम सचिवांनी कॅबिनेट सचिवांना 7 वा वेतन आयोगानुसार 18 महीने कालावधील डीए थकबाकी मिळावी याकरीता अहवाल सादर केलेला आहे . सदरचा अहवाल केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे सादर केला असून , या अहवालास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाल्यास , केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतच्या महागाई भत्ता थकबाकीची रक्कम अनुज्ञेय करण्यात येईल .

या 18 महीने कालावधीमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या कालावधीनुसार डी.ए थकबाकी दिली जाणार आहे .केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचारी या 18 महिने कालावधीमधील डी.ए थकबाकीची आतुरतेने वाट पाहत आहेत .कर्मचाऱ्यांची सदरची अपेक्षा लवकरच पुर्ण होणार आहे .

कोरोना महामारीमुळे सदरचा डी.ए वाढ गोठविण्यात आलेली होती .सदर डी.ए थकबाकी लागु केल्यास कर्मचाऱ्यांना 150,000/- ते 2,18,000/- रुपये पर्यंतची थकबाकीची रक्कम मिळू शकेल .या संदर्भातील निर्णय हे अंतिम टप्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment