कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी चे वेतन / डी.ए थकबाकी व 7 वा वेतन आयोगाचे हप्ते अदा करणेकरीता निधींचे वितरणे करणेबाबत GR निर्गमित !

Spread the love

कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी 2023 च्या वेतन , महागाई भत्ता थकबाकी व सातवा वेतन आयोगाचे हप्ते अदा करणेसाठी राज्या शासनांकडून निधीचे वितरणक करण्यात आला आहे . याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.15.02.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा दि.15.02.2023 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्यातील माध्यमिक शाळा तसेच अशासकीय कनिष्ठ महाविद्यालय त्याचबरोबर सैनिकी शाळांमधील सहायक अनुदाने या लेखाशिर्षाखाली मागणी अनुदान वितरीत करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात आलेली आहे .सन 2022-23 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे .

सदरचा निधी खर्च करताना वित्त विभागाकडून वेळोवेळी घालुन दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आलेले आहेत .त्याचबरोबर पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती / मंत्रीमंडळ यांची मान्यता त्याचबरोबर वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

निधी वितरण करणे संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.15 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment