Business Idea 2023 : लग्नाच्या हंगामातच सुरु करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !

Spread the love

Business Idea 2023 : हंगामाचे आता उन्हाळ्यात आगमन झाले असून त्यामध्ये आता लग्नाचा हंगाम देखील सुरू झालेला आहे. जर तुम्हाला या हंगामामध्ये नवीन व्यवसाय मधून जास्त पैसे कमवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून एका भन्नाट व्यवसायाबद्दल महत्त्वाची माहिती देणार आहोत. ज्या माध्यमातून तुम्ही आत्तापासूनच पुढील दहा ते पंधरा वर्षापर्यंत चांगली कमाई करू शकता.

मित्रांनो विशेष म्हणजे या व्यवसायामध्ये एकदाच गुंतवणूक करायचे आहे. पण पुढील दहा ते पंधरा वर्षे मोठी कमाई करायची आहे ला जरा या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. एकदाच गुंतवणूक करून पुढील दहा ते पंधरा वर्षे बंपर कमाई करण्याची ही एक मोठी संधी आहे.

मित्रांनो या व्यवसायाचे नाव आहे टेन्ट हाऊस व्यवसाय तुम्हाला हा व्यवसाय माहित आहे का? हा व्यवसाय आपल्या गावापासून आपल्या शहरापर्यंत कोठेही आपल्याला सुरू करता येतो. यामध्ये कोणतेही नुकसान नाही मित्रांनो या व्यवसायाचा उपयोग विविध कार्यक्रम विवाह सोहळे सण धार्मिक समारंभ या सोबतच राजकीय व इतर कोणतेही कार्यक्रम केले जातात. त्या ठिकाणी याचा उपयोग मोठा होऊ शकतो.

व्यवसाय किती रुपयांमध्ये सुरू होईल

स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याकरिता खास शासनाने नवीन व्यवसाय उभारणीला अहवाल दिलेले आहेत. त्यामध्ये टेन्ट हाऊस व्यवसाय चा अहवाल देखील मांडला आहे. खादी आणि ग्राम उद्योग आयोग यांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून टेन्ट हाऊस व्यवसायास चार लाख रुपये गुंतवणूक करावी लागते. यामध्ये पाचशे चौरस फूट इतक्या जागेच्या इमारती करिता शेड साठी एक लाख रुपये ह्याशिवाय भांडी टेबल खुर्ची बांबू दोरी पंखा इत्यादी जे काही साहित्य असतील ते खरेदी करण्यासाठी तीन लाख रुपये इतकी इन्वेस्टमेंट करावी लागेल.

किती कमाई होईल :

विशेष म्हणजे टेन्ट हाऊस च्या व्यवसायामध्ये महिन्याभरातच आपण 30 ते 40 हजार रुपयांची कमाई सहजपणे करू शकतो. लग्नाच्या हंगामामध्ये या व्यवसायाची मागणी अगदी मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. मित्रांनो लग्नाच्या हंगामामध्ये या व्यवसायामधून कमाई लाखोच्या घरात देखील जाऊ शकते. या माध्यमातून तुम्ही प्रत्येक सीझनला एक ते पाच लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. तुमची कमाई ही लग्नाच्या किंवा इतर कार्यक्रमांच्या बजेटवर अवलंबून असते.

Leave a Comment