Budget 2023 : अर्थसंकल्पातुन कर्मचाऱ्यांना मिळाला मोठा दिलासा ! जाणुन घ्या सविस्तर डिटेल !

Spread the love

नवी दिल्ली : काल दि.01 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातुन कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे .हे अर्थसंकल्प मोदी सरकारचे शेवटचे अर्थसंकल्प असल्‍याने , यामध्ये सर्व घटकांतील बाबींवर विशेष लक्ष देण्यात आलेला आहे .

कर्मचारी / करदात्यांसाठी सात लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे . यामुळे कर्मचारी / करदात्यांना मोठी सवलत मिळालेली आहे .नविन कररचनेनुसार तीन लाख रुपये पर्यंत 0 प्राप्तिकर लागु करण्यात आलेला आहे .तर 3 लाख ते 6 लाख रुपये पर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के तर 6 ते 9 लाख रुपये पर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर आकारणी करण्यात आली आहे .

सविस्तर कर रचना पुढीलप्रमाणे पाहुयात –

उत्पन्नकर ( % )
0 ते 3 लाख0
3 ते 6 लाख5
6 ते 9 लाख10
9 ते 12 लाख15
12 ते 15 लाख20
15 लाखापेक्षा अधिक30

3 लाख रुपये पर्यंत उप्तन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही .यामध्ये ज्यांचे उत्पन्न 3 लाख रुपये ते 6 लाख रुपये पर्यंत आहे अशांना 5 टक्के कर भरावा लागतो परंतु सदर स्लॅब मधील करदात्यांना आयकर सुट नियमांनुसार वेगवेगळ्या सुट चा लाभ घेतल्यास या स्लॅब मधील करदात्यांना देखिल कर भरावा लागणार नाही .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या अपडेट करीता जॉईन करा Whatsapp ग्रुप .

Leave a Comment