Breaking News : जुनी पेन्शनबाबत राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय !

Spread the love

राज्यातील तब्बल 17 लाख राज्य कर्मचारी दि.14 मार्च पासून बेमुदत संपावर जाणार आहेत , संप काळामध्ये राज्य शासनाचे संपुर्ण कामकाज बंद असणार आहेत .कर्मचाऱ्यांकडुन बेमुदत संप आयोजित करणेबाबत संघटनामार्फत मेळावे घेण्यात येत आहेत . जेणेकरुन कर्मचाऱ्यांची एकजुट वाढून शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्या वेळीच पुर्ण होतील .

जुनी पेन्शन हा राज्यातील कर्मचाऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे . यासाठी राज्य शासकीय  , निमशासकीय , जिल्हा परिषद , शिक्षक / शिक्षकेत्तर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुंबई  येथे बैठक संपन्न झाली आहे .सदर बैठकीस राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक दगडे त्याचबरोबर संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर तसेच सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जे.के महाडिक तसेच जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे कार्यध्यक्ष सागर बाबर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

सदर वरील नमुद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता दि.14 मार्च 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . त्याचबरोबर आगामी लोकसभा / विधानसभा निवडणुकींमध्ये पक्षांच्या जाहीरनाम्यांत जुनी पेन्शन असेल तरच मतदान करणेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .

लोकप्रतिनिधी एका वेळेस निवडून आल्यास त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळते , परंतु आयुष्यभर सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र नविन पेन्शन प्रमाणे नाममात्र तुटपंजुी पेन्शन मिळते , यामुळे जो राकिय पक्ष कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळवून देईल अशाच पक्षाला मतदान करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment