Breaking News : राज्य सरकार जुनी पेन्शन लागू करणार पण …

Spread the love

सध्या जुनी पेन्शन योजनेबाबत कर्मचारी व सरकारचे मोठ्या प्रमाणात वादविवाद सुरू आहेत .सध्या देशांमध्ये छत्तीसगड , पंजाब ,राजस्थान ,हिमाचल प्रदेश राज्यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे .परंतु पहिल्यापासूनच जुनी पेन्शनला केंद्र सरकारचा स्पष्ट विरोध आहे .

केंद्र सरकारची आडकाठी –

जुनी पेन्शन लागू केलेल्या राज्य सरकारला आता केंद्र सरकारने आडकाठी घातली आहे .केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारे अतिरिक्त कर्जामध्ये मोठी घट केली जाणार आहे .सध्या NPS योजनेमध्ये जमा करण्यात येणारी रक्कम केंद्र सरकार वापरत असते .यामुळे या रकमेवर केंद्र सरकार राज्य सरकारला अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देते .आता जर राज्य सरकारने NPS योजना लागू केल्यास त्या राज्याला केंद्र सरकारकडून मिळणारे अतिरिक्त कर्ज मिळणार नाही .

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लवकरच लागू करण्याचा विचार करत आहेत .परंतु महाराष्ट्र राज्यासह इतरही जे राज्य सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार करत आहेत .अशा राज्य सरकारला मिळणारे अतिरिक्त कर्ज कपातीचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे .

NPS पेन्शन योजनेत राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता + मूळ वेतनाच्या 10% रक्कम NPS मध्ये जमा करण्यात येते .तर राज्य सरकारकडून 14% रक्कम जमा करण्यात येते .याच रक्कमेवर केंद्र सरकारकडून अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देण्यात येते .

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती /योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा

Leave a Comment