Breaking News : जुनी पेन्शनबाबत आत्ताची मोठी अपडेट ! सरकारने जुनी पेन्शनला काढले तीन पर्याय !

Spread the love

जुनी पेन्शनचा मुद्दा हा निवडणूकीमध्ये यश / अपयशाचा मुद्दा ठरला असल्याने ,जुनी पेन्शनवर सकारात्मक निर्णय घेणे योग्य वाटत आहे . कारण सन 2024 मध्ये अनेक राज्यांमध्ये निवडणुका आहेत , याकरीता सरकारपुढे खालील नमुद तीने पर्याय खुले झालेले आहेत .जे कि , कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे किमान पेन्शनचा लाभ मिळेल .

पेन्शन करीता कर्मचाऱ्यांकडुन योगदान –

जुनी पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांकडुन योगदान घेण्यात येत नाही , परंतु आंध्र प्रदेश सरकारमार्फत राबविण्यात येणारी जुनी पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांकडुन योगदान दिले जाते . जेणेकरुन सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार देखिल पडत नाही .यामध्ये कर्मचाऱ्यांना काही अंशी जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शनचा लाभ मिळेल परंतु योगदान द्यावे लागेल .

NPS योजनेमध्ये किमान पेन्शनची निश्चिती –

 राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये किमान पेन्शनची निश्चिती करण्याचा उत्तम पर्याय सरकारपुढे आहे . NPS जमा रक्कमेवर   Equity प्रमाणे परतावा न देता Liquid प्रमाणे परतावा दिल्यास कर्मचाऱ्यांच्या जमा रक्कमेवर अधिक जोखिम बाळगावी लागणार नाही . व कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन निश्चिती करता येईल . यामध्ये योगदानानुसार किमान पेन्शन सहज निश्चित करता येईल . ज्यावेळी जमा रक्कमेवर निश्चित दराने परतावा दिला जाईल .

किमान पेन्शनची हमी – अटल पेन्शनप्रमाणे कर्मचाऱ्यांना किमान पेन्शनच्या हमीवर योगदान देता येईल . व कर्मचाऱ्यांना ज्या प्रमाणात पेन्शन हवी आहे . त्याप्रमाणात योगदान देण्यात येईल .सध्या अटल पेन्शन योजनेमध्ये किमान पेन्शन 1000/- तर कमाल पेन्शनची मर्यादा 5,000/- आहे . अधिक पेन्शन देण्याकरीता कमाल पेन्शनची मर्यादा रद्द करावी लागेल .अटल पेन्शनमध्ये जसे फिक्स परतावा दिला जातो , त्याचबरोबर सरकारचेही योगदान देण्यात येते . याप्रमाणे कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करता येईल , असे वरील तीन पर्याय सरकारपुढे आहेत .

कर्मचारी विषयक पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment