Good News : बक्षी समिती खंड – 2 ला राज्य सरकारडून अंतिम मंजुरी ! कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु !

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे , ती म्हणजे वेतनत्रुटीमध्ये सुधारणा करण्यात आलेला बक्षी समिती खंड – 2 ला आता राज्य सरकारकडुन अंतिम स्वरुप देण्यात आलेले आहेत . यामुळे राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना आता सुधाारित वेतनश्रेणीनुसार वेतन मिळणार आहे .

सातव्या वेतन आयोगांमध्ये ज्या पदांच्या वेतनामध्ये त्रुटी आढळून आलेल्या होत्या अशा पदांच्या वेतनाच्या त्रुटींमध्ये सुधारणा करण्याकरीता राज्य सरकारकडून बक्षी समितीची स्थापना करण्यात आली होती . सदर अहवाल राज्य शासनास पुर्वीच सादर केलेला होता , परंतु राज्य शासनाने स्विकारला नव्हता , नुकतेच शिंदे – फडणवीस सरकारने हा अहवाल स्विकारला आहे .

बक्षी समिती खंड – 2 मध्ये समान पद – समान वेतन अशी सुधारणा करण्यात आलेली आहे , तसेच पदोन्नतीच्या संधी त्याचबरोबर अतिरिक्त कार्यभारासाठी वाढीव वेतन अशा तरतुदी करण्यात आलेली आहेत .सदर अहवालास आता राज्य शासनांकडून अंतिम स्वरुप देण्यात आल्याने , कर्मचाऱ्यांच्या वेतन , पदोन्नती बाबतच्या श्रुटी दुर होणार आहेत .

राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून अंतिम मंजूरी देण्यात आली असून , याकरीता राज्य सरकारला अतिरिक्त 200 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे .यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतन मिळणार आहेत .

कर्मचारी विषयक/ पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment