राज्यातील अस्थायी पदांना मुदवाढ देण्यासाठी प्रशासकीय विभागांना अधिकार प्रदान करणेबाबत वित्त विभागांडून दि.08 फेब्रुवारी 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील वित्त विभागाकडून निर्गमित झालेा सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .
सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निमार्ण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही , अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दि.01.03.2023 ते दि.31.08.2023 पर्यंत मुदवाढ देण्याचे अधिकार देण्यात येत आहेत .
सदर कालावधीमध्ये सर्व प्रशासकीय विभागांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयांच्या आस्थापनेवरील मंजुर पदांचा आढावा घेवून सुधारित आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव मान्यता घेणे आवश्यक आहे . यानंतर सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याकरीता कालावधी वाढवून देण्यात येणार नाही असे आदेश देण्यात आलेले आहेत .
याकरीता प्रशासकीय विभागांनी त्यांच्या आस्थापनेवरील पदांचा तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्रिय कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचा आढावा घेवून सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव तातडीने वित्त विभागास सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील वित्त विभागाकडून दि.08 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉइन व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !