Budget 2023: अर्थसंकल्पनेमध्ये जाहीर केलेले कृषी बजेट 10 मुद्द्यांमध्ये समजावून घ्या! कृषी क्षेत्रामध्ये पुढे या योजना राबवल्या जातील !

Spread the love

Budget 2023 : केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरासमोर अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रासाठी विविध घोषणा केल्या आहेत. या माध्यमातून आता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात येणारा असून सरकारने पर्यायी खते व शेनाच्या साह्याने देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याकरिता विशेष असा भर दिला आहे.

याबाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. बाजरीला देखील प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने श्री अन्य योजना राबवली आहे. याबाबतची घोषणा अर्थसंकल्पनेमध्ये करण्यात आली असून अर्थसंकल्प म्हणजे कृषी क्षेत्रामधील काय काय मुद्दे स्पष्ट केले आहेत. याबद्दल जाणून घेऊया.

1) सर्वात प्रथम भरड धान्याचे उत्पादन वाढण्यावर सरकारने भर दिला असून सरकारने या माध्यमातून श्री अन्न योजना राबवली आहे. याबाबतची घोषणा केली असून राष्ट्रीय बाजार संस्था उघडण्यात येतील अशी माहिती स्पष्टपणे सांगितले आहे.

2) नैसर्गिक साधनसामग्रीचा खताचा वापर करून संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याची घोषणा शासनाने केली आहे. यासाठी सरकारने गोबरधन योजना राबवले आहे.

3) खतांच्या पर्यायी स्त्रोतांना प्रोत्साहन देण्याकरिता सरकारने पंतप्रधान प्रणाम कार्यक्रम राबवला आहे.

4) शेतीशी संबंधित जो काही स्टार्टअप असेल तो सुरू करण्यासाठी एर्रिकल्चरल एक्सेल लेटर फंड सुरू करण्यात आला आहे.

5) पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसायावर विशेष भर देण्यासाठी सरकारने वीस लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

6) तीन वर्षांमध्ये एक कोटी शेतकऱ्यांना ऑरगॅनिक फार्मिंग म्हणजेच नैसर्गिक शेती करण्यासाठी पूर्णपणे आधार देण्यात येईल.

7) शासनाच्या नवीन उपक्रमाच्या माध्यमातून मच्छी मासाळी विक्रेते यांच्या क्रियाकलांना सक्षम करण्याकरिता 6000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

8) भारतातील प्रमुख पीक कापूस या कापूस पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी पी पी मॉडेल च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.

9) फलोत्पादनासाठी विविध योजना राबवण्याकरिता 2200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

10) पंतप्रधान मत्स्य व्यवसाय योजने करिता 6000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.

Leave a Comment