7 वा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते , महागाई भत्ता फरक व वेतन देयके सादर करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

Spread the love

राज्य कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते , DA फरक व वेतन देयके सादर करेणबाबत शिक्षण निरीक्षक कार्यालय , बृहन्मुंबई उत्तर विभागाकडून महत्वपुर्ण सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .यासंदर्भातील शिक्षण निरीक्षक कार्यालय यांच्या कडून दि.08.02.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .

माहे फेब्रवारी 2023 पेड इन मार्च 2023 चे नियमित वेतन देयके या कार्यालयास सादर करताना सर्व लेखाशिर्षांतर्गत सातव्या वेतन आयोगाच्या 1 ला व 2 रा हप्ता देणेबाबत सूचना दिलेल्या आहेत . याकरीता शालार्थ प्रणालींमध्ये सुविधा सुरु झालेली आहे . त्यासाठी प्रणालीच्या होमपेजवर यूजर मेन्युअल उपलब्ध आहे .

माहे फेब्रुवारी चे नियमित वेतन देयकासोबत वाढीव महागाई भत्ता फरक व सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हफ्ताचे देयक समाविष्ट करुन सदर फेब्रुवारीचे नियमित वेतन देयक दि.15.02.2023 पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करुन हार्डकॉपी कार्यालयास सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत .त्याचबरोबर शिक्षण सेवकांच्या मानधात वाढ झालेली आहे , त्यानूसार वाढीव मानधन माहे जानेवारी ते 2023 च्या फरकासह शालार्थ प्रणालीतून अदा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत .

त्याचबरोबर पात्र व कार्यरत कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाची तिसऱ्या हफ्यांची देयके ऑफलाईन पद्धतीने शाळा स्तरावर तयार करुन , उपलब्ध अनुदानाची स्थिती पाहून देयके सादर करण्यासाठी स्वंतत्र सूचना देण्यात येणार आहेत .या संदर्भातील शिक्षण कार्यालयाकडून दि.08.02.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहा .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment