राज्यातील सेवानिवृत्त व मयत कर्मचारी यांची सातवा वेतन आयोगाची तिसऱ्या हप्त्याची तसेच महागाई भत्ता फरक पुवरणी देयके स्वीकारण्याबाबत , शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडुन दि.30 जानेवारी 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्णय शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे .या संदर्भाती सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .
सन 2022-23 या आर्थिक वर्षात शाळांची / कनिष्ठ महाविद्यालयांची सेवानिवृत्त व मयत कर्मचारी यांची सातवा वेतन आयोगाची तिसऱ्या हप्याची तसेच महागाई भत्ता फरक पुरवणी देयके सूचित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे या कार्यालयास सादर करणेबाबत सर्व मुख्याध्यापकांना कळविण्यात आलेले होते .
मात्र काही शाळांनी वरील नमुद पुरवणी देयके कोषागार कार्यालयास सादर केलेली नाहीत .सदर पुरवणी देयके सादर न केलेल्या शाळांची यादी देखिल सदर परिपत्रकांमध्ये देण्यात आलेले आहेत .तसेच जे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी 17 मे 2017 च्या शासन निर्णयानुसार दुबार झाले व संबंधित शाळेतून कमी केले गेले अशा कर्मचाऱ्यांची सातवा वेतन आयोगाची तिसरा हप्त्याची देयकेही उपरोक्त नमुद कालावधीत या कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
जे शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी माहे जुलै 2022 ते जानेवारी 2022 या कालावधीत सेवानिवृत्त झाले आहेत त्यांची वाढीव 4 टक्के महागाई भत्त्याच्या फरकाची देयकेही सादर करणेबाबत अवगत करण्यात आलेले आहेत . या संदर्भात दि.30.01.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात . या संदर्भाती शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडुन निर्गमित झालेला सविस्तर शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक ,पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp Group मध्ये सामील व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !