Strike : कर्मचारी निघाले राज्यव्यापी संपावर ! या तीन प्रमुख मागणीसाठी राज्य कर्मचारी आक्रमक !

Spread the love

राज्य शासनाकडुन कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या पुर्ण होत नाहीत . यामुळे कर्मचारी राज्यव्यापी संप करुन राज्य सरकारची कोंडी करणार आहेत . जर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सरकार सकारात्मक पाऊन घेणार नाही , तोपर्यंत संप सुरुच राहणार असल्याची माहिती राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व सल्लागार जी.डी.कुलथे यांनी दिली .राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख तीन मागण्या कोणकोणत्या आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात .

2005 नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना तात्काळ लागु करुन जुनी पेन्शन योजनेमधील सर्व लाभ पुर्वलक्षी प्रभावांने लागु करण्याची मागणी आहे . राज्य शासनांकडुन जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , शिक्षण विभागाकडून अभ्यास सुरु आहे . तसेच राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत सकारात्मक भुमिका देखिल मांडलेली आहे .

परंतु जुनी पेन्शनचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे ,आतापर्यंत आश्वासने देवूनच कर्मचाऱ्यांना शांत ठेवण्यात आले असून ,त्यांच्या पदरी नेहमीच निराशा येते .यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अन्यथा कर्मचाऱ्यांकडुन संप करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिलेला आहे .

यानंतरचा कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी म्हणजे , राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्र सरकार त्याचबरोबर इतर 25 राज्यांप्रमाणे 58 वर्षे वरुन 60 वर्षे करण्यात यावी .जेणेकरुन कर्मचाऱ्यांना आणखीण दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ मिळेल .

तिसरी महत्वाची मोठी मागणी म्हणजे ,बक्षी समिती खंड – 2 अहवालातील वेतनत्रुटी तात्काळ सोडवून , लागु करण्यात यावा . खंड -2 अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा , जेणेकरुन यामध्ये कोणत्या पदांच्या वेतनत्रुटी आहेत , हे कर्मचाऱ्यांना समजेल . अशा प्रमुख तीन मागण्यांसाठी राज्यातील कर्मचारी मार्च महिन्यात राज्यव्यापी संपावर जाणार आहेत .

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Comment