सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते व्याजासह प्रदान करण्याकरीता अतिरिक्त निधींची उपलब्धता !

Spread the love

राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे हप्ते पाच समान हप्त्यामध्ये प्रदान करण्यात येणार आहेत . सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता जुलै 2019 मध्ये अनुज्ञेय करण्यात आला दुसरा हप्ता जुलै 2020 मध्ये अनुज्ञेय होता परंतु कोरोना महामारीमुळे दुसरा हप्ता 2021 मध्ये मिळाला व तिसरा हप्ता 2022 मध्ये प्रदान करण्यात आला आहे .

परंतु राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे पहिलाच हप्ता प्रदान करण्यात आलेला नाही .राज्यातील ज्या कर्मचाऱ्यांना प्रान खाते नंबर मिळालेले नाहीत , अशा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग फरकाचे कोणतेही हप्ते प्रदान करण्यात आलेले नाहीत .अशा कर्मचाऱ्यांचे सर्व प्रथम प्रान खाते नंबर काढून घेतले जात आहेत .यानंतर फरकाचे हप्ते प्रदान करण्यात येणार आहेत .

जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत , किंवा मृत्यु झालेल्या वारसास सातवा वेतन आयोगाचे सर्व हप्ते ( पाचही हप्ते ) व्याजासह प्रदान करणेबाबत राज्य शासनाकडुन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या करीता राज्य शासनाकडून आवश्यक निधींची पुर्तता करण्यात येणार आहे .

राज्यातील ज्या कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगाचा पहिला / दुसरा व तिसरा हप्ता शिल्लक आहे , व ज्या आस्थापनेतील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांने आवश्यक निधींची मागणी करण्यात आलेली होती .अशा कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग फरकाची रक्कम माहे जानेवारी महिन्यांच्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे .या करीता राज्य शासनाकडुन सुमारे 2500 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली होती .

सरकारी कर्मचारी विषयक / पदभरती /योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment