राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबी संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.27.01.2023

Spread the love

राज्यातील महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींसाठी कालबद्ध कार्यक्रम संदर्भात महसुल व वन विभागाकडुन दि.27 जानेवारी 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या संदर्भाती महसूल व वन विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदोन्नतीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी दि.01 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट असे निवडसूची वर्ष निर्धारित करण्यात आले आहे .पदोन्नतीच्या प्रस्तावावर विहीत कालावधीत कार्यवाही पुर्ण करण्याच्या अनुषंगाने महसूल प्रशासकीय विभाग , विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी , नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक तसेच जमाबंदी आयुक्त यांचेस्तरावर दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

दिव्यांग अधिनियम 2016 नुसार शासन सेवेतील गट अ ते गट ड पदांवर शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी 4 टक्के आरक्षण विहीत केले असून ज्या ज्या संवर्गातील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्चित करण्यात आली आहेत . त्या पदांवर पदोन्नती देताना आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

राज्यातील महसूली संवर्गातील अधिकरी / कर्मचारी यांच्या आस्थापनेविषयक निर्णयातील प्रलंबित बाबींसंदर्भात विभागस्तर / जिल्हास्तरावर विशेष मोहिम राबवून दि.30. एप्रिल 2023 पर्यंत कार्यवाही पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .या संदर्भातील महसूल व वन विभागाकडुन दि.27.01.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

सरकारी कर्मचारी विषयक पदभरती , योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment