राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे ! 2 वर्षे अतिरिक्त सेवेचा मिळणार लाभ !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनाच्या मागणीनंतर सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावेत .सध्या देशांमध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर इतर 25 राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले आहेत . याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत कर्मचाऱ्यांची मोठी मागणी आहे .

राज्य सरकारने राज्यतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करणेबाबत , सकारात्मक भुमिका घेतलेली असून ,लवकरच जुनी पेन्शनचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेली आहे .यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना उतारवयांमध्ये हक्काची पेन्शन मिळण्याची आशा पुन्हा पल्लवित होत आहेत .

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे –

राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , या अगोदर देखिल प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता . परंतु या प्रस्तावाला काहींनी विरोध दर्शविला होता , यामुळे हा प्रस्ताव तसाच प्रलंबित राहीला होता . परंतु कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मोठी मागणी कर्मचाऱ्यांकडुन होत आहे .

जुनी पेन्शनचा निर्णय घेण्या अगोदरच राज्यातील कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ अनुज्ञेय करण्यात येईल .सेवानिवृत्तीचे वयांमध्ये वाढ केल्यास राज्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची सेवा त्याचबरोबर पेन्शन मध्ये मोठी होईल .ह

कर्मचारी विषयक , शासकीय पदभरती / योजना त्याचबरोबर ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment