राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार ! जाणून आत्ताची अपडेट !

Spread the love

राज्य शासन सेवेतील शासकीय तसेच निमशासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला आहे . राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे कधी होणार याकडे राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहेत .

देशांमध्ये केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे , याच धर्तीवर देशातील बहुतांश राज्यांनी आपल्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले आहे . परंतु महाराष्ट्र राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत अद्याप पर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही . सध्या राज्य शासन सेवेतील वर्ग अ , ब व क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे आहे तर संवर्ग ड मधील कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे .

सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची आवश्यकता –

सध्या शिक्षणासाठी अनेक वर्षे लागून जातात शिवाय आत्ताच्या स्पर्धेच्या युगांमध्ये शासन सेवेमध्ये उशिराने नोकरी लागत असल्याने , वयांने उशिरा शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना खुपच कमी सेवा मिळते . यामुळे जर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केल्यास अशा उशिरा शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरीक्त सेवेचा लाभ मिळेल .

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत राज्य शासनास विविध कर्मचारी संघटनांकडून वेळोवेळी निवेदने देण्यात आलेले आहेत . या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिव यांच्या बैठक आयोजित करण्यात आलेली होती . परंतु या बैठकीमध्ये उचित असा निर्णय घेण्यात आलेला नव्हता . यामुळे कर्मचारी संघटनांकडुन सेवानिवृत्तीचे वय केंद्रा सरकारच्या धर्तीवर 60 वर्षे करणेबाबत पुन्हा एकदा राज्य शासनास पाठपुरावा केला आहे .सध्या विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने , राज्य शासनाकडुन राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे .

सरकारी कर्मचारी विषयक / पदभरती , शासकीय येाजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Comment