राज्य कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर ! सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतनाची थकबाकी अदा करणेबाबत GR निर्गमित ! दि.16.01.2023

Spread the love

महाराष्ट्र वन‍ विकास महामंडळ मर्यादित मधील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणीअंतर्गत दि.01.01.2016 ते 30.06.2021 या कालावधीची वेतनाची थकबाकी अदा करण्याबाबत प्रस्तावाच्या अनुषंगाने मंत्रीमंडळ उपसमिती गठित करणेबाबत महसुल व वन विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .या संदर्भातील महसूल व वन विभागाकडुन निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांना सातव्या वेतन अयोगानुसार दि.01 जानेवारी 2016 ते दि.30 जुन 2021 या कालावधीतील वेतनाची थकबाकी महामंडळाच्या अंतर्गत स्त्रोतातून मंजुर करणे या प्रस्तावाच्या अनुषंगाने निगडीत सर्व बाबी विचारात घेवून मंत्रिमंडळास या विषयी उचित शिफारस करण्यासाठी मा .उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत करण्यात येत आहे .

या उपसमितीमध्ये राज्याचे वन ,सांस्कृतिक कार्ये व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा.संजय राठोड यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे .या संदर्भातिल महसुल व वन विभागाकडुन दि.16.01.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती , योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Comment