Good News : राज्यातील या कर्मचाऱ्यांना वेतनात मिळणार 10 टक्के वाढ ! शिंदे सरकारची मोठी घोषणा !

Spread the love

शिंदे सरकारकडुन कर्मचाऱ्यांना नविन वर्षांच्या सुरुवातीपासुनच मोठे गिफ्ट देत आहेत . यामध्ये महागाई भत्ता वाढ त्याचबरोबर बक्षी समिती खंड – 2 अहवाल स्विकृत्ती , तसेच राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे फॅमिली पेन्शन व ग्रॅज्युएटी देणेबाबत मोठा निर्णय मोठा निर्णय घेण्यात आला आलेला आहे . यातच आता राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये चक्क 10 टक्के वाढ करण्यात येणार आहे .या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्यातील अंगणवाडी सेविका / मदतनिस कर्मचाऱ्यांच्या विविध मागणींवर चर्चा करण्यासाठी दि.12 जानेवारी 2023 रोजी मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला बोलविण्यात आले होते . यावेळी अंगणवाडी सेविका / मदतनिस कर्मचाऱ्यांच्या नेमक्या कोणकोणत्या समस्या आहेत , या समस्या राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी जाणुन घेतल्या आहेत .सदर बैठकीनंतर राज्य शासनाकडुन निर्णय घेण्यात आला कि , राज्यांमध्ये तब्बल 20 हजार अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येईल .

त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये 10 टक्के वाढ करण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे , या करीता येत्या अर्थसंकल्पामध्ये 140 कोटींच्या निधीची तरतुद करण्यात येणार आहे .त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रकर ॲप युज करण्याकरीता नविन मोबाईल उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे .

या संदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारकडुन लवकरात लवकर करण्यात येणार आहे , या निर्णयामुळे राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविका / मदतनिस कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे .

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Comment