Employee Payment : राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनसंदर्भात अत्यंत महत्वपुर्ण पत्र निर्गमित !

Spread the love

राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन निधी अभावी योग्य वेळेत होत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असुन , यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो . यामुळे राज्य विधानपरीषदेचे सदस्य श्री.कपिल हरिश्चंद्र यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणीस यांना पत्र सादर केले आहे .या संदर्भातील सविस्तर पत्रक आपण पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्यातील शिक्षकांच्या वेतनासाठी दरमहा दिरंगाई होत असल्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे वेतन एकाच वेळी होत नसून काही तालुक्यांतील कर्मचाऱ्यांचे पगार हे दोन महिन्यापासून रखडले जात आहे . पगार विहीत कालावधीत होत नसल्याने राज्यातील शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांचा गृह कर्ज पतसंस्था मधील हप्ते विहील कालावधीमध्ये देता येत नाही . यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामाना करावा लागतोच . शिवाय बँकेचे सिबिल देखिल खरावे होतो , ज्यामुळे बँकांच्या मिळणाऱ्या विविध सुविधांपासुन कर्मचाऱ्यांस वंचित रहावे लागते .

यामुळे राज्यातील शिक्षक , कर्मचाऱ्यांचे पगार विहीत कालावधी म्हणजे दरमहीन्यांच्या 1 तारेखला होण्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतुद करण्याचे आदेश राज्य सरकारकडुन निर्गमित व्हावेत असे आशयाचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले आहे .

शासकीय कर्मचारी / पदभरती , शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment