राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन / सातवा वेतन थकबाकी तसेच इतर देयके अदा करणे संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !

Spread the love

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतन , सातवा वेतन आयोग थकबाकी फरकाचे हप्ते अदा संदर्भात आवश्यक निधींची पुर्तता करणेसंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालक , प्राथमिक शिक्षण संचाचलनालय यांच्याकडुन एक महत्वपुर्ण परिपत्रक दि.23.01.2023 रोजी निर्गमित झालेला आहे . याबाबतचा प्राथमिक शिक्षण संचालक यांचे सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .

सन 2022-23 या आर्थिक वर्षातील माहे मार्च 2022 ते डिसेंबर 2022 या महिन्यांचे सर्व शिक्षकांचे वेतन अदा करणेकामी प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरुन आवश्यक निधीच्या 85 टक्के अनुदान मंजुर करण्यात आलेले आहेत . या अगोदर ज्यांनी सदर निधींमधून सातवा वेतन आयोगाचे हप्ते , थकीत देयके , वैद्यकीय रजा इ.बाबींकरीता निधी खर्च केला आहे अशांवर शिस्तभंगाची कार्यवाही सुरु आहे .

आता सदर परिपत्रकान्वये राज्यातील एकुण 1,78,898 प्राथमिक शिक्षकांचे सातवा वेतन आयोगाचा दुसरा हप्ता अदा करण्यासाठी रुपये 994,35,10,000/- इतक्या तरतूदीची आवश्यक असून ,1,95,714 प्राथमिक शिक्षकांचा तिसरा हप्ता अदा करणेकामी रुपये 1176,86,89,000/- इतक्या निधीची आवश्यकता आहे .त्याचबरोबर वैद्यकी देयके व इतर थकीत देयके अदा करणेसाठी रुपये 343,18,09,000/- इतकी निधीची आवश्यकता आहे .

सदर वरील देयके अदा करणेकामी संचालनालयाकडुन रुपये 2514,40,08,000/- इतक्या निधीस राज्य शासनाकडे मागणी प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे .सदर पुरवणी मागणी प्रस्तावांच्या अनुषंगाने राज्य शासनाने रुपये 1102,76,37,000/- इतकी तरतुद पुरवणी मागणी मंजूर केली आहे .

या संदर्भातील शिक्षण संचालनालय यांच्याकडुन निर्गमित झालेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहू शकता .

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment