या राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय !

Spread the love

हिमाचल प्रदेश राज्यांमध्ये काँग्रेस पक्षांने निवडणुकीच्या प्रचारावेळी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करु असे आश्वासन दिले होते .या आश्वासनाची पुर्तता हिमाचल प्रदेशाचे नव निर्वाचित मुख्यमंत्री मा. सुखूविंदर सिंह यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकींमध्ये केली आहे , यामुळे हिमाचल प्रदेशातील राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनची मोठी गिफ्ट मिळाली आहे .

काँग्रेस पक्षांने जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा मोठ्या प्रमाणात जोर लावून धरला होता . यामुळेच हिामाचल प्रदेश राज्यात जुनी पेन्शनच्या मुद्द्यावरच कॉंग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात मत मिळाली व निवडुन देखिल आले . यामुळे सत्ता स्थापनेनंतर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी कर्मचाऱ्यांना दिलेला आश्वासन पुर्ण करण्याच्या दृष्टीने दि.13.01.2023 वार शुक्रवारी रोजी कॅबिनेट बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे .

या निर्णयामुळे हिमाचल प्रदेश राज्यातील तब्बल 1.36 लाख राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ मिळणार आहे . जुनी पेन्शन पुन्हा सुरु करणारे हिमाचल प्रदेश हे राज्य देशांमध्ये चौथे राज्य ठरले आहे .याशिवाय हिमाचल राज्य सरकारने महिलांना 1500/- रुपये पेन्शन त्याचबरोबर 1 लाख नोकऱ्या देणेबाबत देखिल मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .

सरकारी कर्मचारी / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Comment