केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा माहे जानेवारी 2023 पासून 41 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे . यामुळे डी.ए मध्ये एकुण 3 टक्के वाढ होईल ,यासंदर्भात केंद्र सरकारकडुन मोठा निर्णय दि.01 फेब्रवारीच्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतेवळी घेण्यात येईल .
महागाई भत्ता मध्ये 3 टक्के वाढ –
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना AICPI च्या वाढीव निर्देशांकानुसार , महागाई भत्ता मध्ये 4 टक्के वाढ अपेक्षित होती . परंतु केंद्रीय वित्त मंत्रालयाकडुन 3 टक्के डी.ए वाढीवर शिक्कामार्तब करण्यात आलेला आहे .यामुळे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने डी.ए लाभ मिळत आहे , यामध्ये 3 टक्के वाढीमुळे माहे जानेवारी 2023 पासून 41 टक्के दराने डी.ए लाभ मिळेल .
वित्त विभागांडून प्रस्ताव तयार –
प्रथम आखिल भारतीय सेवेतील महाराष्ट्र राज्यातील कार्यरत अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या वाढीव 3 टक्के डी.ए प्रमाणे लाभ अनुज्ञेय करण्याकरीता वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे .महाराष्ट्र राज्यातील आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या डी.ए इतर वाढीव लाभ तात्काळ लागु करण्यात येते . त्यानंतर राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करण्यात येते .
राज्यातील कर्मचाऱ्यांना सदर 3 टक्के महागाई भत्ता वाढ माहे जानेवारी 2023 पासूनच डी.ए फरकासह लागु करण्यात येईल .यामुळे राज्यातील सर्व शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना मोठा लाभ होणार आहे .
सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !